अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांवरील कर्ज माफ होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 05:50 AM2019-08-28T05:50:58+5:302019-08-28T05:51:00+5:30
चंद्रकांत पाटील : कर्जमाफीच्या निर्णयात सुधारणा
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जुलै २०१९ ते आॅगस्ट २०१९ या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकावरील कर्ज माफ करण्याच्या शासन निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे. पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये खरीप २०१९ या हंगामात घेतलेले कर्ज माफ करण्याचा उल्लेख होता. आता त्याऐवजी या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांसाठी शेतकऱ्यांनी घेतलेले बँकांचे कर्ज माफ होणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे दिली.
सुधारीत निर्णयानुसार, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्था, राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण व जिल्हा मध्यवर्ती बँकांमार्फत बाधित शेतकºयाने नुकसान झालेल्या पिकांसाठी घेतलेले कर्ज माफ होणार आहे. यामुळे भात, भुईमूग,
सोयाबीन, ऊस पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्यानंतर पिकांवरील बँकांच्या कर्ज मर्यादेपर्यंतची रक्कम राज्य शासन बँकांना देणार आहे.
ज्या शेतकºयांनी पीककर्ज घेतले नाही. मात्र, पुरामुळे पिकाचे नुकसान झालेल्या शेतकºयांनाही सर्वसाधारण नुकसान भरपाईच्या तीन पट भरपाई देण्यात येत आहे, असेही पाटील यांनी सांगितले.
तसेच गाळाने भरलेली शेते, माती खरडलेली, गाळाने भरलेली शेती पेरणी योग्य करणे, पडलेली
घरे, अर्धवट पडलेली घरे बांधणे आदी कामे करण्यात येणार आहेत. पूरग्रस्त भागात आणखी चार महिने मोफत धान्य पुरवठा करण्यात येणार आहे, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.