मुंबई - कोरोनाचा फैलाव आणि लॉकडाऊनपासून बंद असलेली मुंबईतील लोकलसेवा आता सर्वसामान्यांसाठी सुरू होण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. गेल्या दहा महिन्यांपासून बंद असलेली मुंबईतील लोकलसेवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी खुली होईल, असे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले आहे.कोरोना नियंत्रणात आल्याने आता मुंबईची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा सुरू करण्यासाठी सर्वसामान्यांकडून मागणी होत आहे. त्यातच राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशानसाने लोकलची दारे सर्वसामान्यांसाठी खुली करण्याची तयारी पूर्ण केली आहे.याबाबत अधिक माहिती देताना अस्लम शेख यांनी सांगितले की, मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी खुली करण्याची तयारी सुरू आहे. आता मुख्यमंत्री आणि टास्क फोर्समधील अधिकाऱ्यांकडून लोकलसेवा सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. त्यांची याबाबत बैठक होणार आहे. तसेच मुंबईतील लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी खुली करण्याबाबतचा अंतिम निर्णय येत्या दोन तीन दिवसांत होईल.दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही आज मुंबईतील उपनगरीय सेवा सुरू करण्याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. कदाचित २९ जानेवारी किंवा १ फेब्रुवारीपासून लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी खुली होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली होती.
"फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून सर्वसामान्यांना लोकल प्रवेश," अस्लम शेख यांचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 10:11 PM