Join us  

लोकल अपघातात एका दिवसात १५ बळी

By admin | Published: July 10, 2016 4:05 AM

रेल्वे रूळ ओलांडणे, छतावरून प्रवास करणे, दरवाजावर स्टंट करणे अशा घटनांमुळे शुक्रवारी दिवसभरात १५ जणांचा बळी गेला असून, १२ प्रवासी जखमी झाल्याची नोंद रेल्वे पोलिसांनी केली आहे.

मुंबई : रेल्वे रूळ ओलांडणे, छतावरून प्रवास करणे, दरवाजावर स्टंट करणे अशा घटनांमुळे शुक्रवारी दिवसभरात १५ जणांचा बळी गेला असून, १२ प्रवासी जखमी झाल्याची नोंद रेल्वे पोलिसांनी केली आहे.१ जुलैला लोकल अपघातांत ६ पुरुष प्रवाशांचा मृत्यू झाला. ७ जण जखमी झाले. २ जुलै रोजी मृतांचा आकडा ३ वर आला तर ८ जखमी झाले. ३, ४, ५ जुलैला अनुक्रमे ४, ५ आणि ६ प्रवाशांचे बळी गेले. या तीन अपघातांत १४ पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. ६ जुलै रोजी झालेल्या अपघातातील मृतांची संख्या ८ वर गेली. ७ जुलै रोजी झालेल्या अपघातात ९ जणांचा बळी गेला. यात ६ पुरुष आणि ३ महिला प्रवाशांचा समावेश होता. याच दिवशी १७ प्रवासी जखमी झाले. त्यात १५ पुरुष आणि २ महिला प्रवाशांचा समावेश होता. ८ जुलैला झालेल्या अपघातांत १५ प्रवाशांनी प्राण गमावले यात १४ पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. तर १० पुरुष आणि २ महिला असे १२ जण जखमी झाले.दरम्यान, जुलै महिन्याच्या सुरुवातीला रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे आरपीएफकडून राबवण्यात आलेल्या उपक्रमांबाबत समाधान व्यक्त करण्यात आले होते. परंतु शुक्रवारी पुन्हा दिवसभरात झालेल्या अपघातांनी प्रशासनाच्या समस्येत भरच घातली आहे. (प्रतिनिधी)आरपीएफची तुकडी स्टंटबाजांचे समुपदेशन करत आहे. संबंधितांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोमवारपासून स्टंटबाजांवर कठोर कारवाई केली जाईल.- सचिन भालोदे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे आरपीएफ