सर्वांसाठी लोकल : केंद्र सरकारने दोन आठवड्यांपूर्वीच अनुकूलता कळवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:06 AM2021-07-23T04:06:22+5:302021-07-23T04:06:22+5:30

राज्याने निर्णय न घेतल्यास सविनय नियमभंगाचा भाजपचा इशारा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना उनगरीय रेल्वे प्रवासाची परवानगी ...

Local for all: The central government announced the favor two weeks ago | सर्वांसाठी लोकल : केंद्र सरकारने दोन आठवड्यांपूर्वीच अनुकूलता कळवली

सर्वांसाठी लोकल : केंद्र सरकारने दोन आठवड्यांपूर्वीच अनुकूलता कळवली

googlenewsNext

राज्याने निर्णय न घेतल्यास सविनय नियमभंगाचा भाजपचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : सर्वसामान्य नागरिकांना उनगरीय रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यास हरकत नसल्याचे केंद्र सरकारने दोन आठवड्यांपूर्वीच स्पष्ट केले आहे. मात्र, राज्य सरकारची धरसोड वृत्ती आणि धोरणाच्या अभावामुळे मुंबई आणि उपनगरासह महानगर क्षेत्रातील नागरिकांना अतोनात हाल सोसावे लागत असल्याचा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी गुरुवारी केला.

भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत उपाध्ये यांनी राज्य सरकारवर टीका केली. भाजप मुंबईतील लोकल सुरू करण्याच्या प्रश्नावर आक्रमक आहे. मुंबईतील सामान्य नोकरदार, कष्टकऱ्यांना उपनगरी प्रवासाची परवानगी न देणाऱ्या ठाकरे सरकारला धडा शिकविण्यासाठी सामान्य मुंबईकर २ ऑगस्टपासून सविनय नियमभंग करीत लोकल प्रवास सुरू करतील, असा इशारा उपाध्ये यांनी यावेळी दिला.

मुंबईतील प्रवासाच्या सुविधेबाबत ठाकरे सरकारकडे धोरण नसल्याने सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. केंद्राने दोन आठवड्यांपूर्वीच सर्वांसाठी लोकल सुरू करण्यास अनुकूलता दाखविली आहे. मात्र, राज्य सरकारकडून सामान्य जनतेच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. टाळेबंदीबाबतच्या राज्य सरकारच्या धरसोडपणामुळे जनतेचे जगणे अगोदरच मुश्कील झाले आहे. त्यामुळे एकतर प्रवासाची मुभा द्या किंवा प्रवास खर्चापोटी पाच हजार रुपयांचा भत्ता द्या, अशी भाजपची भूमिका आहे. लोकल अभावी वैतागलेला सामान्य माणूस आघाडी सरकारच्या निषेधार्थ २ ऑगस्टपासून मोफत लोकल प्रवास करून सविनय नियमभंग आंदोलन करेल, असा इशाराही उपाध्ये यांनी दिला.

आघाडीचा खोटेपणा उघड

ऑक्सिजनअभावी झालेल्या मृत्युंबाबत मुख्यमंत्र्यांसह महाविकास आघाडी नेत्यांनी केंद्र सरकारवर आरोप केले. मात्र, राज्य सरकारने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्रात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार आणि त्यांच्या नेत्यांचा खोटेपणा न्यायालयात सादर प्रतिज्ञापत्राने उघड झाल्याचे केशव उपाध्ये म्हणाले.

Web Title: Local for all: The central government announced the favor two weeks ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.