सर्वांसाठी लोकलचा निर्णय लांबणीवर? राज्य सरकार, रेल्वे प्रशासनातील बैठकीत चर्चा झालीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2020 09:05 AM2020-10-22T09:05:58+5:302020-10-22T09:06:42+5:30
सर्वांसाठी लोकल प्रवास सुरू व्हावा यासाठी आता मुंबईकरांना फार काळ वाट पाहण्याची गरज नाही. पुढच्या दोन ते तीन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होईल, असे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सुरू आहे. दरम्यान, लोकल सेवेसंदर्भात बुधवारी राज्य सरकार आणि रेल्वे अधिकारी तसेच विविध संघटनांमध्ये बैठक झाली.
मात्र या बैठकीत सर्वांसाठी लोकल सुरू करण्यासंदर्भात चर्चा झालीच नाही. संयुक्त बैठकीत कोणत्या संघटनेत किती कर्मचारी आहेत, रेल्वेत सध्या किती कर्मचारी काम करतात, याचा आढावा घेण्यात आला. बैठकीला मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्य सरकारचे अधिकारी, रेल्वे अधिकारी आणि विविध संघटनांचे प्रमुख उपस्थित होते.
पुढील दोन ते तीन दिवसांतच होणार निर्णय - वडेट्टीवार
सर्वांसाठी लोकल प्रवास सुरू व्हावा यासाठी आता मुंबईकरांना फार काळ वाट पाहण्याची गरज नाही. पुढच्या दोन ते तीन दिवसांत यावर शिक्कामोर्तब होईल, असे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अॅड. आदेश भगत म्हणाले की, संस्था, संघटनांपैकी कोणत्या घटकांना अत्यावश्यक सेवेत प्रवासाची मुभा द्यायची यावर चर्चा झाली. लोकलच्या मुद्द्यावर राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनाने बोलणे टाळल