टिटवाळा : मध्य रेल्वेच्या टिटवाळा स्थानकात सायडिंगला उभ्या असलेल्या लोकलला शनिवारी पहाटे साडेचार वाजता अचानक आग लागली. या आगीत एक डबजळून खाक झाला. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समजते. कल्याणच्या अग्निशमन दलाच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आणली.ही आग ज्या ठिकाणी लागली होती, त्या ठिकाणी रेल्वेचे पॉवर हाऊस आहे. आग वाढली असती तर पॉवर हाऊसने पेट घेतला असता तर मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले असते. कल्याण अग्निशमन दलाच्या साहाय्याने सदर आग आटोक्यात आणण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले. ती कशी लागली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. रेल्वे प्रशासनाची यंत्रणा सज्ज या घटनेमुळे रेल्वे वाहतुकीवर मात्र कुठल्याही प्रकारचा परिणाम झाला नाही. लोकल सायडिंगला उभी असताना या ट्रेनचा विद्युतपुरवठा पूर्णपणे खंडित करण्यात येत नसल्याचे सांगितले जाते. मग, शॉर्टसर्किट झाले की गर्दुल्ल्यांनी काडी वगैरे टाकल्याने ती लागली असावी का, अशा चर्चेला येथे उधाण आले आहे.आग कशामुळे लागली, याची रेल्वेचे विशेष पथक चौकशी करून अहवाल सादर करेल. त्यानंतर, ती कशी लागली, हे समजेल. - व्ही.के. शर्मा, टिटवाळा रेल्वे स्थानक प्रबंधक
टिटवाळ्यात लोकलला आग
By admin | Published: January 17, 2016 1:24 AM