सर्वसामान्यांसाठी लोकल; महापालिकेचे तळ्यात-मळ्यात, कोरोना स्थितीचा आढावा घेऊनच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2020 03:35 AM2020-12-04T03:35:38+5:302020-12-04T08:06:03+5:30

१५ डिसेंबरपर्यंत सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार आहे. तत्पूर्वी कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. एक ते दोन दिवस नेमकी काय स्थिती आहे हे पाहून त्यानंतरच रेल्वे प्रशासनाला विनंती केली जाईल

Local for the general public; The decision was taken after reviewing the situation of Corona in the municipal pond | सर्वसामान्यांसाठी लोकल; महापालिकेचे तळ्यात-मळ्यात, कोरोना स्थितीचा आढावा घेऊनच निर्णय

सर्वसामान्यांसाठी लोकल; महापालिकेचे तळ्यात-मळ्यात, कोरोना स्थितीचा आढावा घेऊनच निर्णय

Next

मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी लागू केलेले लॉकडाऊन शिथिल होत असतानाच कोरोनावरही बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले जात आहे. परिणामी मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल १५ डिसेंबरनंतरच्या मुहूर्तावर सामान्यांसाठी सुरू होण्याची चिन्हे असली तरी याबाबतचा निर्णय कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊनच घेतला जाईल, असेही मुंबई पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

पालिकेच्या उपाययोजनांमुळे दिल्लीच्या तुलनेत मुंबईने कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविले आहे. याच सकारात्मक बाबीमुळे १५ डिसेंबरनंतर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू करण्याबाबत प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. आठवडाभरात होणाऱ्या बैठकीत याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल. कोरोना स्थितीचा आढावा घेऊनच सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना याबाबत माहिती विचारण्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. मात्र सूत्रांकडील माहितीनुसार, येत्या आठवडाभरात याबाबत बैठक होईल. या बैठकीला राज्य, महापालिका आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित राहतील. बैठकीत चर्चेअंती सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत निर्णय हाेईल.

...त्यानंतरच रेल्वेला विनंती
१५ डिसेंबरपर्यंत सामान्यांसाठी लोकल सुरू करण्याचा विचार आहे. तत्पूर्वी कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाईल. एक ते दोन दिवस नेमकी काय स्थिती आहे हे पाहून त्यानंतरच रेल्वे प्रशासनाला विनंती केली जाईल. मात्र याचा अर्थ १५ डिसेंबर किंवा त्यानंतर लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू होतील, असा घेता येणार नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त  सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले.

Web Title: Local for the general public; The decision was taken after reviewing the situation of Corona in the municipal pond

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.