गड्या आपली लाेकलच बरी... बेस्ट बस, ओला-उबरपेक्षा स्वस्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 02:14 PM2024-10-17T14:14:24+5:302024-10-17T14:16:57+5:30
मध्य रेल्वेने सुमारे ३७ आणि पश्चिम रेल्वेने सुमारे ३२ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. लोकल सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे हजारो कोटी रुपये खर्च करीत आहे. दिवसेंदिवस रेल्वेची प्रवासी संख्या आणि व्यवस्थेवरील खर्च वाढत असला तरी रेल्वेने गेल्या १३ वर्षांपासून उपनगरीय प्रवासी भाड्यामध्ये वाढ केलेली नाही.
मुंबई : मुंबईची जीवन वाहिनी म्हणून संबोधली जाणारी मुंबई लोकल ही इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत स्वस्त असल्याचे मध्य रेल्वेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान मुंबई लोकलने सेकंड क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशाला फक्त २२ पैसे इतके भाडे मोजावे लागते, तर एक महिन्याचा पास काढल्यास ११ पैसे इतके भाडे मोजावे लागतात.
मध्य रेल्वेने सुमारे ३७ आणि पश्चिम रेल्वेने सुमारे ३२ लाख प्रवासी रोज प्रवास करतात. लोकल सेवेचा दर्जा सुधारण्यासाठी भारतीय रेल्वे हजारो कोटी रुपये खर्च करीत आहे. दिवसेंदिवस रेल्वेची प्रवासी संख्या आणि व्यवस्थेवरील खर्च वाढत असला तरी रेल्वेने गेल्या १३ वर्षांपासून उपनगरीय प्रवासी भाड्यामध्ये वाढ केलेली नाही.
रेल्वेचा प्रतिप्रवासी खर्च हा उत्पन्नापेक्षा ७० टक्के अधिक असून, रेल्वे हा खर्च माल वाहतुकीच्या उत्पन्नातून भरून काढते ,असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
- रेल्वेला प्रवासी वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न हे केवळ ३० ते ३५ टक्के आहे, तर माल वाहतुकीतून मिळणारे उत्पन्न हे ६५ ते ७० टक्के आहे.
- बेस्ट बसने प्रत्येक २.५ किमी प्रवासासाठी पाच रुपये, टॅक्सिने दर किमी प्रवासासाठी १८.६ रुपये, तर रिक्षाने प्रति किलोमीटर १५.५ रुपये मोजावे लागतात.
- ओला-उबर प्रीमियम गाडीने प्रवास करण्यासाठी प्रति किमी २५ ते ३० आणि मेट्रोने तीन-साडेतीन रुपयांचा खर्च येतो.
सीएसएमटी ते ठाणे प्रवास करण्याचा खर्च (रुपयांमध्ये)
प्रवासाचा प्रकार तिकीट किंमत प्रति किमी खर्च
द्वितीय प्रथम एसी द्वितीय प्रथम एसी किमी
एकल १५ ८५ ९५ ०.२२ १.२५ १.४० ६८
मासिक पास २१५ ७५५ १८०० ०.११ ०. ३७ ०.८८ २०४०
त्रैमासिक पास ५९० २०४५ ०. १० ०. ३३ - - ६१२०
सहामाही पास ११८० ४०८० - - ०.१० ०. ३३ - १२२४०
वार्षिक पास २३५० ८१५० - - ०.०९ ०. ३३ - २४८२०