Join us

लोकल प्रवासात चोरीचे प्रकार वाढले

By admin | Published: July 20, 2014 11:18 PM

मध्य रेल्वेच्या लोकल प्रवासात सोनसाखळी आणि मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

ठाणे : मध्य रेल्वेच्या लोकल प्रवासात सोनसाखळी आणि मोबाइल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या चालू वर्षातील पहिल्या सात महिन्यांत दाखल झालेल्या एकूण १७४ गुन्ह्यांमध्ये सुमारे ५० लाखांचा डल्ला चोरट्यांनी मारला आहे. यामध्ये सार्वाधिक ३१ घटना दाखल असलेल्या ठाण्यात सुमारे ७ लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. त्यानंतर दादर आणि कुर्ल्यात चोरट्यांनी हातचलाखी दाखवून दिली आहे. विशेष म्हणजे लोकलच्या खिडकीत बसून आणि दारात उभे राहून प्रवास करणाऱ्यांना चोरट्यांकडून टार्गेट केले जाते, अशी माहिती सूत्रांनी सांगितले. ६७ जेरबंद केलेल्या चोरट्यांकडून चोरीला गेलेल्या एकूण ४९ लाख ७६ हजारांच्या मुद्देमालापैकी १० लाख ४३ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)