लोकल, मेट्रो, मोनो रेल्वेची नाळ जुळणार; प्रवास सुखकर करण्यासाठी आराखडा होतोय तयार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 07:17 AM2020-07-18T07:17:14+5:302020-07-18T07:18:04+5:30
मेट्रो मार्गिकांवर १२ ठिकाणी होणार प्रवासी सेवांची अदलाबदल
मुंबई : मुंबईतील मेट्रो मार्गिकांचे जाळे विस्तारत असताना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणचा प्रवास सुकर व्हावा यासाठी अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी मेट्रोची जोडणी अत्यावश्यक ठरणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने पहिल्या टप्प्यात अशा १२ ठिकाणी प्रवासी सेवांची अदलाबदल करण्यासाठी सोय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या जोडणीसाठी आराखडा तयार करण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे.
मेट्रो २ ब आणि सात या मार्गिका पुढील महिन्याच्या मध्यापर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने उर्वरित मार्ग सुरू करण्याचे एमएमआरडीएचे प्रयत्न आहेत. परंतु, हे मार्ग सुरू करीत असताना मुंबईतील लोकल ट्रेन, मोनो रेल्वे आणि भविष्यात सुरू होणाºया हायस्पीड रेल्वेची स्थानके मेट्रो स्थानकांशी जोडली जाणे आवश्यक आहे. तसे झाले तर मुंबईतल्या प्रवासी सेवा अधिक सक्षम होतील आणि प्रवास सुखकर होणार आहे. पहिल्या तीन टप्प्यांत अशी १२ ठिकाणे एकमेकांशी जोडण्याचे नियोजन आहे.
चार ठिकाणी मेट्रो मार्गिकांची स्टेशन्स जोडली जाणार आहेत. पाच ठिकाणी एफओबींच्या साहाय्याने जोडणी केली जाणार आहे. तर, लोकल, मोनो आणि हायस्पीड रेल्वेची स्टेशन्स आणखी पाच ठिकाणी जोडली जाणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे आराखडे १२ महिन्यांत, दुसºया टप्प्याचे २४ महिन्यांत तर तिसºया टप्प्याचे ३६ महिन्यांत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यापैकी काही जोडणी ठिकाणांची व्यवहार्यतासुद्धा तपासावी लागणार आहे.
या सर्व कामासाठी एमएमआरडीएने सल्लागार
नेमण्याचा निर्णय घेतला असून, त्यावर ३ कोटी ४३ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
सार्वजनिक प्रवासी सेवांची प्रस्तावित जोडणीची ठिकाणे
जोडणी मेट्रो मार्गिका
मेट्रो स्टेशन
गांधीनगर, कांजूरमार्ग ४ आणि ६
कापूरबावडी ४ आणि ५
आयएलएफएस ४ आणि ५ ईईएच
सिद्धार्थनगर २ ब आणि ४
परस्पर जोडली जाणारी स्टेशन्स
( पश्चिम, मध्य आणि हार्बर)
मानखुर्द मेट्रो आणि हार्बर स्टेशन २ ब आणि हार्बर रेल्वे
विक्रोळी मेट्रो आणि मध्य रेल्वे स्टेशन ४ आणि मध्य रेल्वे
गांधीनगर मेट्रो आणि
कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन ४ आणि मध्य रेल्वे
भांडुप मेट्रो आणि भांडुप रेल्वे स्टेशन ४ आणि मध्य रेल्वे
अदलाबदल करण्यासाठी एफओबी
डीएन नगर मेट्रो १ आणि २ ब
शास्त्रीनगर ते आदर्शनगर २ आणि ६
अंधेरी पूर्व ते पश्चिम द्रुतगती मार्ग ७ आणि १
चेंबूर मेट्रो स्टेशन ते व्हीएनपी आणि
आसरी मार्ग मोनो रेल्वे स्टेशन २ ब आणि मोनेरेल
जेव्हीएलआर मेट्रो ७ आणि ६
हायस्पीड रेल्वेला जोडणी
आयएलएफएस मेट्रो स्टेशन
२ ब आणि हायस्पीड रेल्वे