लोकल प्रवासी अपघात 15 टक्क्यांनी घटले
By Admin | Published: September 2, 2014 02:19 AM2014-09-02T02:19:40+5:302014-09-02T10:04:53+5:30
टपावर बसून, दोन डब्यांच्या मधोमध उभे राहून, खिडकीवर - दरवाजात लटकून, रेल्वे रूळ ओलांडणारे यांची संख्या लक्षणीय आहे.
अनिकेत घमंडी - ठाणो
मध्य रेल्वेतून दररोज सुमारे 41.5क् लाख प्रवासी प्रवास करतात. यात टपावर बसून, दोन डब्यांच्या मधोमध उभे राहून, खिडकीवर - दरवाजात लटकून, रेल्वे रूळ ओलांडणारे यांची संख्या लक्षणीय आहे. यात काहींचा अपघात होऊन अनेकदा मृत्यू अथवा कायमचे अपंगत्व येत असल्याच्या दिवसाला किमान 1क् घटना दोन्ही रेल्वेच्या चारही दिशांवर होत असतात. याठिकाणी महाविद्यालयीन विद्यार्थी, रेल्वे प्रशासन, सुरक्षा यंत्रणा, रेल्वे प्रवासी संघटना आदींच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबवले जाते. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा सहाच महिन्यांत अपघातांचे प्रमाण 15 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती मध्य रेल्वेच्या उपनगरीय रेल यात्री उपभोक्ता समितीचे माजी सदस्य जितेंद्र विशे यांनी ‘लोकमत’ला दिली.
मिळालेल्या तुलनात्मक आकडेवारीतून अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. लोहमार्ग पोलिसांच्या मुंबईअंतर्गत येणा:या उपनगरीय स्थानकांदरम्यान तब्बल 16 प्रमुख पोलीस ठाणी येतात. त्यातून म.रे.अंतर्गत येणा:या 76 स्थानकांसह त्यातून प्रवास करणा:या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेचे नियोजन केले जाते.या ठिकाणांच्या अपघातांच्या आकडेवारी वरून हे प्रमाण कमी झाल्याचे स्पष्ट होते.
च्प्रवाशांनी गैरमार्गाने प्रवास करू नये, यासाठी पथनाटय़े, प्रवासी सुरक्षा अभियान, सुरक्षा सप्ताह, पोस्टर्स-होर्डिग्ज यांसह उद्घोषणा यंत्रंद्वारे सूचना आदी उपक्रमांमधून जनजागृती केली जाते. त्यामध्ये प्रशासन-संघटना आणि विद्याथ्र्याचा पुढाकार लक्षणीय असतो.
च्प्राप्त आकडेवारीवरून 2क्13मध्ये ऑगस्ट महिन्यार्पयत अपघातांच्या आकडेवारीत 1,324 प्रवासी तर 2क्14मध्ये 1,129 प्रवाशांचे अपघात झाले आहेत. यावरूनच अपघातांमध्ये साधारणत: 15 टक्क्यांची घट झाल्याचे निदर्शनास येत आहे.
महिने2क्132क्14
जानेवारी138 168
फेब्रुवारी147 163
मार्च171 183
एप्रिल18क् 126
महिने2क्132क्14
मे 172 149
जून 16क् 175
जुलै161 118
ऑगस्ट185 क्59