सीसीटीव्ही असणारी लोकल धावलीच नाही
By Admin | Published: October 3, 2015 03:02 AM2015-10-03T03:02:14+5:302015-10-03T03:02:14+5:30
महिला डब्यात सीसीटीव्ही असणारी पहिली लोकल २ आॅक्टोबरपासून धावेल, अशी घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली. परंतु ही घोषणा हवेतच विरली आणि
मुंबई : महिला डब्यात सीसीटीव्ही असणारी पहिली लोकल २ आॅक्टोबरपासून धावेल, अशी घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली. परंतु ही घोषणा हवेतच विरली आणि सीसीटीव्ही असणारी लोकल धावलीच नाही.
शनिवारी ही लोकल धावेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली होती. परेच्या ३ लोकलमधील महिला डब्यात सीसीटीव्ही बसवण्यात आल्यानंतर मध्य रेल्वेकडूनही महिला डब्यात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मध्य रेल्वेच्या १० लोकलमधील ५0 महिला डब्यांत सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.
सीसीटीव्ही असणारी पहिली लोकल २ आॅक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत येईल, अशी घोषणा मध्य रेल्वेकडून करण्यात आली. या लोकलमधील महिला डब्यांमध्ये १० सीसीटीव्ही बसविण्यात आले. या लोकलबद्दल महिला प्रवाशांमध्ये उत्सुकता होती. मात्र ही लोकल शुकवारी धावलीच नाही. त्याची माहितीही देण्यात न आल्याने महिला प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटला.
काही तांत्रिक कारणांमुळे सीसीटीव्ही असणारी लोकल धावू शकली नाही. शनिवारी ही लोकल धावेल, असे रेल्वेतील एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे शनिवारीही ही लोकल धावणार की नाही
याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)