Join us

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ साजरा करणार मराठी भाषा दिवस, उद्धव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती

By मनोहर कुंभेजकर | Published: February 22, 2024 9:32 PM

मुंबई - दि.२७ फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस ’’मराठी भाषा दिवस’’ म्हणून साजरा केला जातो. ...

मुंबई- दि.२७ फेब्रुवारी हा दिवस ज्येष्ठ साहित्यिक वि.वा.शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस ’’मराठी भाषा दिवस’’ म्हणून साजरा केला जातो. प्रतिवर्षाप्रमाणे शिवसेना प्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने मराठी भाषा दिवसानिमित्त मंगळवार दि. २७ फेब्रुवारी, रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई रुग्णालय शेजारी, न्यू मरीन लाईन्स येथे सायंकाळी ६-०० ते रात्रौ ९- ३० या कालावधीत संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे आणि प्रमुख उपस्थिती शिवसेना नेते, युवासेनाप्रमुखं आदित्य ठाकरे उपस्थित राहणार आहेत.

सदर कार्यक्रमाचे आयोजन स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, शिवसेना नेते आणि माजी खासदार. अनिल देसाई,महासंघ कार्याध्यक्ष,आमदार. विलास पोतनीस, महासंघ कार्याध्यक्ष आमदार सुनिल शिंदे आणि महासंघ सरचिटणीस प्रदिप मयेकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून कार्यक्रमाच्या नियोजनासाठी महासंघ पदाधिकारी आणि संलग्न समित्यांचे पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

या कार्यक्रमादरम्यान 'मोगरा फुलला' सादरकर्ते व संगीतकार राहुल रानडे यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. सदर कार्यक्रमास शिवसेना नेते, लोकप्रतिनिधी, विविध आस्थापनातील स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

जागतिक मराठी भाषा दिवसाचा कार्यक्रम एक आगळावेगळा कार्यक्रम म्हणून समितीच्या चळवळीच्या इतिहासात कार्यक्रमाची नोंद होईल असा प्रयत्न सर्व कार्यकर्त्यानी करावा असे आवाहन महासंघाने केले आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबई