मध्य रेल्वेवर एसी लोकल ही अफवाच

By admin | Published: May 9, 2017 01:04 AM2017-05-09T01:04:00+5:302017-05-09T01:53:46+5:30

मध्य रेल्वेवर कल्याण-सीएसटीदरम्यान वातानुकूलित लोकल धावणार असल्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील चर्चेमुळे सोमवारी प्रवाशांमध्ये

A local rickshaw on the Central Railway | मध्य रेल्वेवर एसी लोकल ही अफवाच

मध्य रेल्वेवर एसी लोकल ही अफवाच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : मध्य रेल्वेवर कल्याण-सीएसटीदरम्यान वातानुकूलित लोकल धावणार असल्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील चर्चेमुळे सोमवारी प्रवाशांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली होती. मात्र, या लोकलच्या अद्यापही चाचण्याच सुरू आहेत. त्यामुळे ती कधी धावणार, कोणत्या मार्गावरून धावणार, याबाबतच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे स्पष्टीकरण मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी दिले.
पाटील म्हणाले की, दिवसभर सुरू असलेल्या चर्चांचे मेसेज आम्हालाही मिळाले. पण, त्यात तथ्य नसल्याचे ते म्हणाले. बहुतांशी रेल्वे प्रवाशांमध्ये याबाबतची चर्चा होती. कल्याण-डोंबिवली-ठाणे-घाटकोपर-दादर-सीएसटी या स्थानकांमध्ये या लोकलला थांबा आहे. कुर्ला आणि भायखळा स्थानकांत ही गाडी थांबणार नाही. तसेच कल्याण-ठाणे १२०० रुपये, कल्याण-घाटकोपर १९०० रुपये, कल्याण-दादर ३००० रुपये, तर कल्याण-सीएसटी ३६०० रु. मासिक पासासाठी आकारले जाणार असल्याची माहिती या मेसेजमध्ये आहे. त्यामुळे या लोकलचा महागडा प्रवास परवडणार का? रेल्वे सुविधा काय देते, अशा विविध पद्धतीने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

Web Title: A local rickshaw on the Central Railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.