रखडलेल्या प्रकल्पामुळे लोकल सेवा विस्कळीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 03:06 AM2019-06-26T03:06:15+5:302019-06-26T03:07:37+5:30

मुंबई उपनगरीय लोकल मार्गावरील अनेक प्रकल्प रखडल्याने लोकल सेवेवर याचा परिणाम होत असल्याचे प्रवासी संघटनांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या लोकल बिघाडामुळे, रखडलेल्या प्रकल्पामुळे लोकल सेवा खंडीत होते.

 Local service disrupted due to the planned project | रखडलेल्या प्रकल्पामुळे लोकल सेवा विस्कळीत

रखडलेल्या प्रकल्पामुळे लोकल सेवा विस्कळीत

Next

मुंबई  - मुंबई उपनगरीय लोकल मार्गावरील अनेक प्रकल्प रखडल्याने लोकल सेवेवर याचा परिणाम होत असल्याचे प्रवासी संघटनांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या लोकल बिघाडामुळे, रखडलेल्या प्रकल्पामुळे लोकल सेवा खंडीत होते. याबाबत प्रवासी संघटनेने मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. प्रवासी संघटनांनी रखडलेल्या प्रकल्पाचा वेग वाढविण्याची मागणी केली. ठाणे ते दिवा पाचवी आणि सहावी मार्गिका, सीएसएमटी ते कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका, कल्याण ते आसनगाव तिसरी मार्गिका असे प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ९१ टक्के वेळेचे पालन करत असल्याची या चर्चासत्रात वरिष्ठ अधिकाºयांनी माहिती दिली. यासह विद्याविहार आणि ठाणे येथे ठरविण्यात आलेली वेगमर्यादा वाढविण्यात येणार असल्याची माहिती दिली.

सिग्नल यंत्रणेतील होणारे बिघाड दुरुस्त करून आधुनिकता आणण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले. गर्दीच्या वेळी लोकल सेवा खंडीत
होत असल्याने याचा फटका लाखो प्रवाशांना होतो. यावर मध्य रेल्वे प्रशासन योग्य पावले उचणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

उपाय योजना करणार

प्रवाशांना दररोज लोकलच्या ढिसाळ कारभाराला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रवाशांचे प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या अधिकाºयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मध्य रेल्वे मार्गावर नवीन उपाययोजना करण्यात असल्याचे आश्वासन दिले असल्याचे रेल यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी सांगितले.

Web Title:  Local service disrupted due to the planned project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.