अनंत चतुर्दशीला रात्रभर लोकल सेवा

By admin | Published: September 13, 2016 05:32 AM2016-09-13T05:32:17+5:302016-09-13T05:32:17+5:30

चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट दरम्यान आठ फेऱ्या १५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत चालविण्यात येतील

Local service over Anant Chaturdashi overnight | अनंत चतुर्दशीला रात्रभर लोकल सेवा

अनंत चतुर्दशीला रात्रभर लोकल सेवा

Next

मुंबई : अनंत चतुर्दशीला गणरायाचे विसर्जन करून परतणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्व रात्रभर लोकल सेवा देणार आहे. चर्चगेट ते विरार आणि विरार ते चर्चगेट दरम्यान आठ फेऱ्या १५ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून ते पहाटेपर्यंत चालविण्यात येतील.
विरारला जाताना पहिली विशेष लोकल ही चर्चगेटहून मध्यरात्री १.१५ वाजता सोडण्यात येईल. ही लोकल विरार येथे २.४७ वाजता पोहोचेल. दुसरी लोकल १.५५ वाजता, तिसरी लोकल २.२५ वाजता, तर चौथी लोकल चर्चगेटहून पहाटे ३.२0 वाजता विरारसाठी सोडण्यात येईल. विरारहून चर्चगेटसाठी पहिली लोकल 00.१५ वाजता सुटेल. ही लोकल चर्चगेट स्थानकात मध्यरात्री १.४५ला पोहोचेल. दुसरी विरारहून 00.४५ वाजता, तिसरी १.४0 वाजता तर चौथी मध्यरात्री २.५५ वाजता सोडण्यात येणार आहे. या लोकल चर्चगेट ते विरार दरम्यान सर्व स्थानकांवर थांबतील.

Web Title: Local service over Anant Chaturdashi overnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.