मुंबई - मुंबईची लाइफलाइन असलेली लोकल सर्वसामान्यांसाठी लवकरात लवकर सुरू व्हावी, अशी मागणी जोरदार लावून धरल्यामुळे अखेर लसीचे दोन डोस घेतलेल्यांकरिता लोकल सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत.
माझे लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, त्यामुळे मी लोकलचा प्रवास करू शकतो. कोरोनाच्या काळात लोकल बंद असल्याने मला बसनेच प्रवास करावा लागत होता, त्यामुळे प्रवास करण्यात खूप वेळ जातो. आता वेळ वाचेल. कामावर पोहोचण्यात २ ते ३ तास जास्तीचे जात होते. तो वेळ कुटुंबाला देता येईल.
दामजी नंदू
......
लोकल प्रवास सुरू झाला ते बरे झाले. मी मालाडला कामाला आहे. मला मालाड ते विरार असा प्रवास बसने करावा लागत असे. किमान तीन तास प्रवासात जात होते. खर्चही जास्त होता. बस चुकली तर रिक्षाने यावे लागायचे. तोही खर्च वाचला. बससाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागत होते. तो त्रास कमी झाला.
- विशाल अग्रवाल
....
सध्या १८ ते ४४ वयोगटातील लोकांचे लसीकरण मोठ्या प्रमाणावर बाकी आहे. ते लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे; पण लसीकरण केंद्रावर अजूनही लस उपलब्ध नसल्यामुळे गोंधळ उडतो आहे. कोणत्याही बंधनाशिवाय लोकल प्रवास सुरू व्हायला हवा.
- समीर परब
......