Join us

हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचा खोळंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 8:03 AM

मुंबईतील हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे वाहतूक सोमवारी सकाळी विस्कळीत झाली आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याने पनवेलच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे लोकल गाड्या 25-30 मिनिटे उशिराने धावत आहेत.

मुंबई : मुंबईतील हार्बर मार्गावरील उपनगरीय रेल्वे वाहतूक सोमवारी सकाळी विस्कळीत झाली आहे. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकाजवळ रुळाला तडे गेल्याने पनवेलकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. 

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावरील रुळाला तडे गेल्यामुळे लोकल गाड्या 25-30 मिनिटे उशिराने धावत आहेत.

दरम्यान, हार्बर मार्गावर वारंवार लोकल गाड्यांचा खोळंबा होण्याचे शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. गेल्या आठवड्यात सकाळी हार्बर रेल्वे मार्गावर सीवूड्स ते बेलापूर स्थानकादरम्यान अप मार्गावर रुळाला तडे गेल्याची घटना घडली होती. यामुळे सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यानंतर खारघर रेल्वे स्थानकात लोकलमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. 

टॅग्स :मुंबई लोकल