Join us

Mumbai Train Status : माहीम स्थानकाजवळ लोकलचे डबे रुळावरून घसरले, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 12:50 IST

Mumbai Train Status : सीएसएमटीहून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे डबे रुळावरुन घसरले.

मुंबई : माहीम स्थानकाजवळ लोकलचे डबे रुळावरुन घसरले आहेत. त्यामुळे हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, माहीम स्थानकाजवळ सीएसएमटीहून वांद्र्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे डबे रुळावरुन घसरल्यामुळे हार्बर रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे लोकलचे डबे घसरल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, अंधेरी ते सीएसएमटीच्या अप आणि डाऊन मार्गावरी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. 

दरम्यान, घटनास्थळी रेल्वेचे अधिकारी दाखल झाले असून दुरुस्ती करण्याचे काम सुरु आहे. 

टॅग्स :मुंबई ट्रेन अपडेटलोकलमुंबईहार्बर रेल्वे