Join us  

Local Train Mega block: हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर या रविवारी मेगाब्लॉक, पाहा कुठे आणि किती वाजता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2023 6:15 AM

सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी, ९ एप्रिल रोजी, मेगाब्लॉक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी ९ एप्रिल रोजी रेल्वेच्या हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

हार्बर रेल्वे

कुठे : कुर्ला - वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर, कधी : सकाळी ११:१० ते सायंकाळी ४:१० वाजेपर्यंतपरिणाम : सीएसएमटी येथून पनवेल/ बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. पनवेल येथून सीएसएमटीकरिता सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते कुर्ला स्थानकादरम्यान  लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाइन सेवा उपलब्ध असेल.

पश्चिम रेल्वे

कुठे : सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाउन जलद मार्गावर, कधी : स. १० ते दु. ३परिणाम : अप-डाउन जलद मार्गावरील लोकल सेवा सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर वळविल्या जातील.  बोरिवलीहून सुटणाऱ्या काही लोकल गाड्या गोरेगाव स्थानकापर्यंत धावतील. 

टॅग्स :मुंबई लोकलहार्बर रेल्वेपश्चिम रेल्वे