पश्चिम रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत, घरी परतणाऱ्या प्रवाशांचे हाल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 10:48 PM2018-08-22T22:48:29+5:302018-08-22T22:54:07+5:30
रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. लोकल रेल्वेच्या मार्गावरील रुळाला तडे गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
मुंबई - रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. लोकल रेल्वेच्या मार्गावरील रुळाला तडे गेल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे रेल्वेची जलद वाहतूक अर्ध्या तासापासून बंद आहे. तर वांद्रे धीम्या मार्गावर लोकल ठप्प झाली आहे.
पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवासी जलद लोकलने प्रवास करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर 20-25 मिनिटे लोकल उशिराने धावणार आहे. रेल्वे सूत्रानुसार, रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुरुस्तीनंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. प्रवाशांच्या तक्रारीनंतर बिघाड दूरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेला ट्विट करुन याबाबत कळविण्यात येत आहे. तर माध्यमांनीही विचारणा केली आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वे कडून अद्याप काही माहिती उपलब्ध नाही.
Kindly look into it @drmbct please.
— Western Railway (@WesternRly) August 22, 2018