लोकल प्रवास सर्वांत धोकादायक

By admin | Published: January 23, 2016 04:12 AM2016-01-23T04:12:50+5:302016-01-23T04:12:50+5:30

उपनगरीय रेल्वेची स्थिती चिंताजनक असल्याचे रेल्वेमंत्री सांगत असतानाच मुंबई उच्च न्यायालयानेही मुंबईचा लोकल प्रवास जगातील सर्वांत धोकादायक प्रवास असल्याचे मत नोंदविले आ

Local travel is most dangerous | लोकल प्रवास सर्वांत धोकादायक

लोकल प्रवास सर्वांत धोकादायक

Next

मुंबई : उपनगरीय रेल्वेची स्थिती चिंताजनक असल्याचे रेल्वेमंत्री सांगत असतानाच मुंबई उच्च न्यायालयानेही मुंबईचा लोकल प्रवास जगातील सर्वांत धोकादायक प्रवास असल्याचे मत नोंदविले आहे. रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा आरक्षित ठेवावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका ए.बी. ठक्कर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावरील सुनावणीवेळी न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी ताशेरे ओढले.
पनगरीय रेल्वेमार्गावर वर्षाला तीन ते चार हजार प्रवाशांना प्राण गमवावे लागतात. जगातील अन्य रेल्वेमार्गांवरील अपघातांपेक्षा मुंबईत अपघातांचे प्रमाण जास्त आहे, असे उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि रेल्वेची हतबलता पाहता उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला फैलावर घेण्यात आले. सरकारने बघ्याची भूमिका न घेता रेल्वेला मदत करावी. राज्य सरकार आपली जबाबदारी यातून झटकू शकत नाही, असे मत न्यायालयाने नोंदविले.

Web Title: Local travel is most dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.