Join us  

लोकल प्रवास सर्वांत धोकादायक

By admin | Published: January 23, 2016 4:12 AM

उपनगरीय रेल्वेची स्थिती चिंताजनक असल्याचे रेल्वेमंत्री सांगत असतानाच मुंबई उच्च न्यायालयानेही मुंबईचा लोकल प्रवास जगातील सर्वांत धोकादायक प्रवास असल्याचे मत नोंदविले आ

मुंबई : उपनगरीय रेल्वेची स्थिती चिंताजनक असल्याचे रेल्वेमंत्री सांगत असतानाच मुंबई उच्च न्यायालयानेही मुंबईचा लोकल प्रवास जगातील सर्वांत धोकादायक प्रवास असल्याचे मत नोंदविले आहे. रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र डबा आरक्षित ठेवावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका ए.बी. ठक्कर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. यावरील सुनावणीवेळी न्यायमूर्ती नरेश पाटील यांनी ताशेरे ओढले.पनगरीय रेल्वेमार्गावर वर्षाला तीन ते चार हजार प्रवाशांना प्राण गमवावे लागतात. जगातील अन्य रेल्वेमार्गांवरील अपघातांपेक्षा मुंबईत अपघातांचे प्रमाण जास्त आहे, असे उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि रेल्वेची हतबलता पाहता उच्च न्यायालयाकडून राज्य सरकारला फैलावर घेण्यात आले. सरकारने बघ्याची भूमिका न घेता रेल्वेला मदत करावी. राज्य सरकार आपली जबाबदारी यातून झटकू शकत नाही, असे मत न्यायालयाने नोंदविले.