सर्वसामान्यांसाठी लोकलचा प्रवास लवकरच खुला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:05 AM2021-01-10T04:05:57+5:302021-01-10T04:05:57+5:30
पुढील आठवड्यात घेणार निर्णय सर्वसामान्यांसाठी लोकलचा प्रवास लवकरच खुला? पुढील आठवड्यात घेणार निर्णय लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लोकलचा ...
पुढील आठवड्यात घेणार निर्णय
सर्वसामान्यांसाठी लोकलचा प्रवास लवकरच खुला?
पुढील आठवड्यात घेणार निर्णय
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लोकलचा प्रवास सर्वांसाठी खुला करायचा का नाही? याबाबत राज्य सरकार मंगळवारी निर्णय घेईल, अशी माहिती महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयाला शुक्रवारी दिली.
२३ मार्च २०२० पासून सर्वसामान्यांसाठी लोकल बंद करण्यात आली. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल सुरू ठेवण्यात आली. आता जवळपास आठ महिन्यांनंतर सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याने सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरू होणार, असा सवाल मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला केला.
त्यावर महा अधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी याबाबत येत्या मंगळवारी राज्य सरकार निर्णय घेईल, अशी माहिती खंडपीठाला दिली.
उच्च न्यायालयासह कनिष्ठे न्यायालयेही पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने वकिलांनाही लोकलने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका वकिलांच्या संघटनांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सध्या वकिलांना संध्याकाळी ४ ते ७ या वेळेत लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, वकिलांना मासिक पास किंवा परतीचे तिकीट देण्यात येत नाही, अशी तक्रारही न्यायालयात करण्यात आली आहे.
न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी बुधवारी ठेवली आहे.