Join us  

लोकल कल्लोळ! मध्य रेल्वेचा 'जम्बो' ब्लॉक अन् प्रवाशांची तारांबळ

By सचिन लुंगसे | Published: May 31, 2024 7:30 PM

ब्लॉकमुळे फलाटांवरील दाखल गर्दीला ब्लॉकचा फटका बसल्याचे चित्र होते.

मुंबई : ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाटांच्या विस्तारीकरणासाठी हाती घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे लोकल प्रवाशांचे शुक्रवारी हाल झाले. शुक्रवारी सकाळी पीक अवरला कर्जत, कसा-याहून मुंबईत दाखल होणा-या लोकल भरून वाहत होत्या. तर बहुतांशी रेल्वे स्थानकांवरील इंडीकेटरवर लोकल दाखल होण्याची वेळ व प्रत्यक्ष लोकल होणारी वेळ; यात जमीनआसमानचा फरक होता. त्यामुळे फलाटांवरील दाखल गर्दीला ब्लॉकचा फटका बसल्याचे चित्र होते.मध्य रेल्वेने शुक्रवारच्या ब्लॉकसाठी १६१ लोकल फे-या रद्द करत प्रवाशांना महत्त्वाच्या कामासाठीच लोकलने प्रवास करण्याचे आवाहन केले होते. ब्लॉकला पर्यायी व्यवस्था म्हणून एसटी आणि बेस्टनेही अतिरिक्त बस उपलब्ध करून दिल्या होत्या. शिवाय स्कूल बसनेही सार्वजनिक वाहतूक सेवेला प्राधान्य दिले होते. पर्यायी वाहतूक व्यवस्था असतानाही प्रवाशांनी लोकलला प्राधान्य दिल्याने किंचित का होईना होणारे हाल कायम होते. कर्जत, कसारा, पनवेल येथून मुंबईत दाखल होणा-या लोकलला सकाळी आणि दुपारी गर्दी कायम होती. दुपारी २ ते ४ या काळात लोकलला गर्दी कमी असली तरी या काळात फॅमिलीसोबत बाहेर पडलेल्या प्रवाशांना ब्लॉकचा किंचित का होईना फटका बसला.

कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक ४ वर सीएसएमटी येथे जाण्यासाठी १.३८ ची लोकल लावण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र २.५९ वाजता लोकल फलाटावर आली. त्यानंतर २.५४ ची सीएसएमटी लोकल लावण्यात आली. प्रत्यक्षात मात्र फलाटावर एसी लोकल दाखल झाली. त्यामुळे नंतर दाखल होणा-या लोकलची प्रवाशांना वाट बघावी लागली.

महत्त्वाचे मुद्दे -

- पहाटेपासून लोकल सेवा खोळंबली- लोकल सुमारे ३० मिनिटे विलबांने धावत होत्या.- लोकल लेट आणि घाम काढणा-या उन्हाळ्याचे प्रवासी त्रस्त झाले होते.- अनेक कार्यालयांनी कर्मचा-यांना घरून काम करण्याची परवानगी दिली होती.- दुपारी रेल्वे स्थानकांत कमी गर्दी होती.- ब्लॉकची कामे सुरू असल्याने लोकल डोंबिवली, कल्याण दरम्यान एका मागे एक थांबल्या होत्या. - सीएसएमटी, भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड स्थानकात तुरळक गर्दी होती.- हार्बरवरील लोकल १५ मिनिटे उशिराने धावत होत्या. 

टॅग्स :मुंबईलोकलमध्य रेल्वे