शौचालयासाठी स्थानिकांचा लढा
By admin | Published: November 26, 2014 12:28 AM2014-11-26T00:28:26+5:302014-11-26T00:28:26+5:30
एकीकडे संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत अभियान सुरू असताना मुंबईतील भांडुप विभागात राहणा:या टाटानगर येथील हजारो कुटुंबीय गेल्या 20 वर्षापासून शौचालयांच्या मूलभूत हक्कासाठी लढा देत आहेत.
Next
मनीषा म्हात्रे ल्ल मुंबई
एकीकडे संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत अभियान सुरू असताना मुंबईतील भांडुप विभागात राहणा:या टाटानगर येथील हजारो कुटुंबीय गेल्या 20 वर्षापासून शौचालयांच्या मूलभूत हक्कासाठी लढा देत आहेत. यातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे महिलांनाही उघडय़ावर शौचासाठी बसावे लागत असल्याचे चीड आणणारे वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे ज्या प्रभागात ही समस्या आहे, तेथे भाजपाचे नगरसेवक आहेत.
या विभागात जवळपास साडेतीन हजार कुटुंबे गेल्या 2क् ते 25 वर्षापासून वास्तव्यास आहेत. यामध्ये जवळपास 4क् टक्के महिलावर्ग आहे. एकीकडे मूलभूत सुविधेसाठी झगडताना नाकीनऊ येत असताना स्थानिकांना शौचालयासारख्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. नागरिक राहत असलेली जागा ही मिठागर विभागाची असल्याने स्थानिक भाजपा नगरसेवक मंगेश पवार तेथे शौचालय उभारू शकत नसल्याचे कारण देत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. अशात नागरिकांना रस्त्याकडेला शौचास बसावे लागते. त्यातही उघडय़ावर बसल्याने पोलिसांच्या दंडेलीलाही या रहिवाशांना सामोरे जावे लागत आहे.
मतदानावेळी आम्ही कुठल्या जागेवर राहतो, याचा विचार न करता आदर सत्काराने मतदान केंद्रार्पयत नेले जात़े मात्र जेव्हा दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची वेळ येते, तेव्हाच लोकप्रतिनिधी अजिबात आवाज उठवत नसल्याचे स्थानिक पल्लवी दत्ताराम गावडे यांनी सांगितले.
आम्ही आमच्या खर्चाने करीत असलेल्या शौचालयांच्या कामाला अडवण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही हायवेवर रास्तारोको आंदोलनाचा मार्ग निवडू, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. म्हाडातर्फेशौचालय बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे; मात्र मिठागर विभागाकडून त्यासाठी परवानगी मिळत नसल्याने हे काम खोळंबून राहिले आहे. तरीही या कामाबाबत माङो प्रयत्न सुरू असल्याचे स्थानिक भाजपा नगरसेवक मंगेश पवार यांनी सांगितले.
च्गेल्या 2क् वर्षापासून सुरू असलेल्या या लढय़ात संबंधित प्रशासनापासून लोकप्रतिनिधींच्या पाय:या ङिाजवून सुद्धा काहीही उपयोग झालेला नाही. प्रत्येकी 1क्क् रु पये काढून शौचालय बांधण्याचा निर्णय स्थानिकांनी घेतला. स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून शौचालयाची टाकी बांधण्याचे काम सुरू केले.
च्परिसरातील शौचालयासारख्या समस्येचे निराकरण व्हावे, म्हणून हे पाऊल उचलल्याचे श्री स्वामी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी सांगितले. परिसरातील एकूण 4 ठिकाणी सहाआसनी शौचालये उभारण्याबाबत परवानगी देण्याबाबतचे पत्र मिठागर विभागाला देण्यात आल्याचेही जाधव यांनी सांगितले.