Join us

स्फोट, आग, धूर आणि भीती, धुरामुळे स्थानिकांना वायुप्रदूषणाचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 5:25 AM

मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूरसह लगतच्या परिसरात खतांच्या आणि तेलकंपन्या असून, येथील परिसर ‘हेव्ही इंडस्ट्रियल झोन’ घोषित आहे.

मुंबई : मुंबईच्या पूर्व उपनगरातील चेंबूरसह लगतच्या परिसरात खतांच्या आणि तेलकंपन्या असून, येथील परिसर ‘हेव्ही इंडस्ट्रियल झोन’ घोषित आहे. याच परिसरातील बीपीसीएलच्या रिफायनरी हायड्रोजन क्रॅकर प्लाँटमध्ये बुधवारी दुपारी ३च्या तीनच्या सुमारास स्फोट होत आग लागल्याची घटना घडली. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, माहुल, चेंबूर, वडाळा, सायन-प्रतीक्षानगरलगतचा परिसरही स्फोटाने हादरल्याचे स्थानिकांनी सांगितले.स्फोट आणि आगीची तीव्रता पाहता स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्फोटाची तीव्रता एवढी होती की, त्यामुळे माहुल गावासह लगतचा परिसर हादरला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर घटनास्थळी आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले. केवळ माहुल नव्हे, तर चेंबूर, वडाळा, सायन-प्रतीक्षानगर लगतचा परिसरही स्फोटाने हादरला.दुर्घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या वतीने सुरुवातीला नऊ फायर इंजिन, एक जेटी, चार रुग्णवाहिका, सायन आणि राजावाडी रुग्णालयाच्या अत्यावश्यक वाहन सेवेसह उर्वरित साधनसामुग्री घटनास्थळी पाठविण्यात आली. आग रौद्र रूप धारण करत असल्याने, घटनास्थळवरील साधनसामुग्रीमध्ये आणखी वाढ करण्यात आली. अग्निशमन दलाच्या पंधराहून अधिक गाड्या, २५ हून अधिक रुग्णवाहिकांसह अत्यावश्यक सेवांद्वारे येथील मदतकार्याने वेग पकडला.खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले की, आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. स्थानिक आमदार तुकाराम काते यांनी सांगितले, दुर्घटनास्थळी अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम वेगाने करण्यात आले.आगीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. धुरामुळे येथे वायुप्रदूषण झाले आहे. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम आरोग्यावर होऊ नये, म्हणून महापालिकेने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशीमागणी लोकप्रतिनिधींनी केली आहे. दरम्यान, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही कंपनी सरकारद्वारे नियंत्रित केली जाते. डी. राजकुमार हे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. मुंबईत कंपनीचे मुख्यालय आहे. तेल, गॅसची निर्मिती कंपनीकडून केली जाते. कंपनीच्या मुंबई, कोचीनमध्ये दोन मोठ्या रिफायनरी आहेत.>‘हादसों का शहर’ ही उक्ती ठरली खरीमुंबईला ‘हादसों का शहर’ म्हटले जाते. दररोज येथे छोटे-मोठे अपघात होत असतात. मात्र, जुन्या चाळी आणि इमारतींमधील ४० वर्षे जुन्या सदोष वायरिंगने अपघातांचा धोका वाढविला आहे. ही धक्कादायक बाब अग्निशमन दलाच्या अहवालातून समोर आली होती.सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक ५५० दुर्घटना घडल्या. यामध्ये आठ जण मृत्युमुखी, तर ३९ जखमी झाले. प्रत्येक महिन्यात दोनशे ते अडीचशे दुर्घटना घडतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. २०१६मध्ये दरमहा सरासरी ३००-३५० दुर्घटना घडल्या आहेत. ही बाब शहरासाठी धोक्याची घंटा आहे.सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात २९६ दुर्घटना घडल्या. बहुतांश आगींमागचे कारण शॉर्टसर्किट असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.मुंबई शहर आणि उपनगरांत लागणाऱ्या आगीच्या दुर्घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठिकठिकाणी बसविण्यात आलेले फायर हायड्रंट तसे पाहिले तर मदतनीसच. येथे दाटीवाटीने वसलेल्या इमारतींच्या परिसरात आग लागल्यास, ती विझविण्यासाठी अग्निशमन यंत्रणा फायर हायड्रंटची मदत घेते.शहरासह उपनगरांत ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या सुमारे १० हजार ४९७ ब्रिटिशकालीन फायर हायड्रंटपैकी ९ हजार ४०५ फायर हायड्रंट बंद अवस्थेत आहेत. म्हणजे केवळ सुमारे ९२ फायर हायड्रंट सुरू असल्याची वस्तुस्थिती काही महिन्यांपूर्वी समोर आली होती.गेल्या पाच वर्षांत आगीच्या दुर्घटनांमध्ये आठ जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात ३ जवान आणि ५ अधिकाºयांचा समावेश आहे. अग्निशमन दलाचा वार्षिक अर्थसंकल्प २५० कोटी रुपये आहे.मुंबईपासून काही अंतरावर समुद्रातील जवाहर दीप बेटावरील डिझेल टँकच्या परिसरात वीज कोसळून येथील इंधनाच्या टँकना आग लागल्याची दुर्घटना घटना घडली होती. सुदैवाने दुर्घटनेत जीवितहानी झाली नव्हती.वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाडा, गरीबनगर झोपडपट्टीतील अनधिकृत झोपड्यांवर महापालिकेतर्फे कारवाई सुरू असतानाच लागलेल्या आगीत शेकडो झोपड्या जळून खाक झाल्या होत्या. या दुर्घटनेत दोन जण जखमी झाले.वडाळा ते चेंबूर या मार्गावर धावणाºया मोनोरेलच्या एका डब्याला मैसूर स्थानकावर आग लागली होती. सुदैवाने यात जीवितहानी झाली नव्हती.मुंबई शहर आणि उपनगरात सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यात १ हजार २६९ दुर्घटना घडल्या. या दुर्घटनांत ६२ जण जखमी, तर १९ जणांचा मृत्यू झाला.१ ते १५ सप्टेंबरदरम्यान ३१६ घटना घडल्या. त्यात २५ जण जखमी झाले, तर १२ जणांचा मृत्यू झाला.१६ ते ३० सप्टेंबरदरम्यान ३५९ घटना घडल्या. त्यात १४ जखमी झाले, तर ३ जणांचा मृत्यू झाला.सप्टेंबरमध्ये विलेपार्ले येथील जुहू प्रार्थना येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला आग लागली. आगीत २४ जण जखमी झाले. त्यापैकी ९ जणांचा मृत्यू झाला.१ ते १५ आॅक्टोबरदरम्यान २७६ दुर्घटना घडल्या. त्यात ९ जण जखमी झाले, तर २ जणांचा मृत्यू झाला.१५ ते ३१ आॅक्टोबरदरम्यान ३१८ घटना घडल्या. त्यात १४ जण जखमी झाले, तर २ जणांचा मृत्यू झाला.स्फोटातील जखमींची नावेभूषण पंडित, सरबजीत मंडल, सुशील भोसले, कृष्णमूर्ती, अवधूत परब, शेख मोहम्मद सुद, मनदीप वालवे, फिलीप कुरीयन, नितीन म्हात्रे, अस्लम शेख, परमानंद हावरे, विनय शेडगे, संजय साखरे, सुशील शिवणकर, राहुल झाजुरराव, सचिन सदाफुले, शमीम खान, अजय सुर्वे, जयप्रकाश कदम, रमेश कुमार. आगीमुळे धुराचे लोट पसरले. केवळ माहुल नव्हे, तर चेंबूर, वडाळा, प्रतीक्षानगर लगतचा परिसरही स्फोटाने हादरला.

टॅग्स :मुंबईबीपीसीएल आग