मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता रविवारी सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ पर्यंत माटुंगा - मुलुंड अप आणि डाऊन धीमी मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर नेरुळ / बेलापूर - उरण बंदर मार्ग वगळून पनवेल - वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०:१४ ते दुपारी ३:१८ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. सकाळी १०:५८ ते दुपारी ३:५९ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल मुलुंड येथे अप जलद मार्गावर, मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला व सायन येथे थांबवल्या जातील.
डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल टिटवाळा असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ही लोकल सकाळी ९:५३ वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून लोकल दुपारी ३:३२ वाजता सुटेल. अप धीम्या मार्गावर ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल आसनगाव असेल. ठाणे येथून ही लोकल सकाळी १०:२७ वाजता सुटेल. ब्लॉकनंतरची पहिली लोकल कल्याण असेल.
हार्बर मार्ग सकाळी १०:३३ ते दुपारी ३:४९ वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९:४५ ते दुपारी ३:१२ वाजेपर्यंत पनवेल / बेलापूरकडे जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील. सकाळी ११:०२ ते दुपारी ३:५३ वाजेपर्यंत पनवेल येथून ठाणे येथे जाणारी सेवा आणि पनवेल येथून ठाणे येथे जाणारी सेवा स. १०:०१ ते दुपारी ३:२० वाजेपर्यंत बंद राहील.
ट्रान्स हार्बरडाऊन ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी ९:३९ वाजता सुटेल. पनवेल येथे सकाळी १०:३१ वाजता पोहोचेल. ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल दुपारी ४ वाजता असेल. पनवेल येथे सायंकाळी ४:५२ वाजता पोहोचेल. अप ट्रान्स हार्बर मार्गावर ब्लॉकपूर्वी ठाण्याला जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०:४१ वाजता सुटेल. ठाणे येथे सकाळी ११:३३ वाजता पोहोचेल. ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल सायंकाळी ४:२६ वाजता सुटेल.