लॉकडाऊनमध्ये वृद्धाश्रम, अनाथालयांना मिळणाऱ्या देणग्या ६० टक्क्यांनी घटल्या, आर्थिक घडी विस्कटली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 07:31 AM2020-08-30T07:31:06+5:302020-08-30T07:31:41+5:30

मुंबई शहर, उपनगरात हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या अशा संस्था असून, काहींचा आवाका मोठा तर काहींचा छोटा आहे. काही संस्था केवळ एका खोलीत सुरू आहेत.

Lockdown drops donations to old age homes, orphanages by 60 per cent, financial crisis shakes | लॉकडाऊनमध्ये वृद्धाश्रम, अनाथालयांना मिळणाऱ्या देणग्या ६० टक्क्यांनी घटल्या, आर्थिक घडी विस्कटली

लॉकडाऊनमध्ये वृद्धाश्रम, अनाथालयांना मिळणाऱ्या देणग्या ६० टक्क्यांनी घटल्या, आर्थिक घडी विस्कटली

googlenewsNext

- सचिन लुुंगसे
मुंबई : कोरोनाचा फटका वृद्धाश्रम आणि अनाथालयांनाही बसला आहे. जूनपर्यंतच्या काळात वृद्धाश्रम आणि अनाथालयांना मिळणाºया देणग्या ६० टक्क्यांनी घटल्या. त्यामुळे त्यांचे आर्थिक घडी विस्कटली. तुटपुंज्या मदतीवर त्यांना कसाबसा उदरनिर्वाह चालवावा लागत आहे.

मुंबई शहर, उपनगरात हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या अशा संस्था असून, काहींचा आवाका मोठा तर काहींचा छोटा आहे. काही संस्था केवळ एका खोलीत सुरू आहेत. कोरोना, लॉकडाऊनचा फटका या सर्वांना बसला. मुंबईत काम करणाºया वृद्धाश्रम, अनाथालयांशी संवाद साधला असता बहुतांश संस्थांनी मदतीचा ओघ थांबल्याचे सांगितले. काहींना आरोग्याच्या अडचणी आल्या. मात्र काही अंशी दानशूर व्यक्तींकडून मदतीचा ओघ सुरूच होता. तो पुरेसा नव्हता. छोट्या संस्थांना खूप मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले.
घाटकोपर येथील वृद्धाश्रम चालवणाºया राखी यांनी बºयाच अडचणी आल्याचे सांगितले. आम्ही सर्वांनी मिळून यावर धीराने मात केल्याचे त्या म्हणाल्या. मालाड, मालवणीतील लहान मुलांसाठी कार्यरत उम्मीद फाउंडेशनच्या सलमा मेमन यांनीही कोरोनामुळे अडचणी आल्याचे म्हटले. मालाड, मालवणीसारख्या झोपड्यांच्या परिसरात पिण्याचे पाणीही विकत घ्यावे लागते. अशावेळी मदत करणारे किती मदत करणार? त्यामुळे आमच्या स्तरावर शक्य तेवढे प्रयत्न केले. स्वच्छतेसाठी सॅनिटायजर वापरा, असे सांगितले जाते. मात्र जी मुले झोपड्यांत, कचºयाच्या ढिगाºयावर राहतात त्यांचे काय? त्यांच्या शिक्षणाचे काय? लोकांना आवाहन केले तरी मदत किती होईल ते माहिती नव्हते. कारण कोरोनामुळे सर्वांच्याच अडचणी वाढल्या. आता थोड्या का होईना अडचणी कमी होऊ लागल्या आहेत. आमच्याकडे साडेचारशे मुले आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी आम्ही सर्व स्तरावर प्रयत्न करीत आहोत, असे मेमन यांनी सांगितले.
कांदिवली येथील सदादेवी फाउंडेशन ओल्ड एज होमने सांगितले, आम्हालाही अडचणी आल्या. मात्र आमच्या स्तरावरच आम्ही सर्वांनी एकजुटीने त्या सोडविल्या. आम्हाला नेहमी मदत करणाºया लोकांनी या वेळीही मदत केली. अन्नधान्य असो किंवा आणखी काही, सर्व मदत मिळत होती. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.
(क्रमश:)

हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर
हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मदतीचा ओघ सुरू होऊ लागला आहे. मात्र, सरकारने यात लक्ष घालावे आणि वृद्धाश्रम, अनाथालयांना या कोरोना संकट काळातून बाहेर पडायला मदत करावी, असे मत या संस्थांकडून व्यक्त केले जात आहे.

Web Title: Lockdown drops donations to old age homes, orphanages by 60 per cent, financial crisis shakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.