लॉकडाऊन संपला, थकीत वीज बिलांच्या वसुलीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:06 AM2021-06-11T04:06:25+5:302021-06-11T04:06:25+5:30

वीज कंपन्यांकडून ग्राहकांना शॉक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने ...

Lockdown ended, recovery of overdue electricity bills ordered | लॉकडाऊन संपला, थकीत वीज बिलांच्या वसुलीचे आदेश

लॉकडाऊन संपला, थकीत वीज बिलांच्या वसुलीचे आदेश

Next

वीज कंपन्यांकडून ग्राहकांना शॉक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने आता बऱ्यापैकी शिथिल केले असून, हळूहळू का होईन जनजीवन पूर्वपदावर येते आहे. मात्र कोरोना काळात वापरलेल्या विजेचे बिल अद्यापही काही वीज ग्राहकांनी भरलेले नाही. त्यामुळे ही विजेची थकबाकी वाढतच असून, आता पुन्हा एकदा विजेची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरणसह बेस्ट, अदानी आणि टाटासारख्या वीज कंपन्यांनी कंबर कसली आहे.

कोरोना आणि लॉकडाऊनसह इतर अनेक कारणांमुळे आर्थिक परिस्थिती आणखी बिकट होत आहे. विजेच्या थकबाकीचा आकडा आता कोट्यवधींच्या घरात पोहचला आहे. सदर थकबाकी वसूल झाली नाही तर आर्थिक संकट आणखी वाढण्याची शक्यता असून साहजिकच त्याचा फटका सरतेशेवटी वीज ग्राहकांना बसणार आहे. ग्राहकांना अखंड वीजपुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीज खरेदी करावी लागते. वीज खरेदी बरोबरच वीजवहनासाठी सुद्धा खर्च करावा लागतो.

देखभाल व दुरुस्तीची कामे व इतर खर्च टाळणे शक्य नाही. अशा बिकट आर्थिक परिस्थितीतून वीज कंपन्या जात असतात. मार्च २०२० पासून लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर ग्राहकांनी त्यांची वीज देयके भरली नाहीत. परिणामी थकबाकी खूप वाढली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून नाईलाजाने फेब्रुवारी व मार्च २०२१ मध्ये थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर अनेक ग्राहकांनी आपले थकीत वीजदेयक भरले. पण आजही कित्येक ग्राहकांनी आपली देयके भरली नाही. त्यामुळे ही थकबाकी कोट्यवधी झाली आहे.

जीव धोक्यात टाकून वीज कर्मचारी दिवस रात्र काम करीत आहेत. रुग्णालयाच्या वीजपुरवठ्याला प्राधान्य देऊन घरगुती तसेच सर्व क्षेत्रामध्ये अखंडित वीजपुरवठा करणे आवश्यक असून वीज अधिकारी व कर्मचारी युद्धपातळीवर काम करीत आहेत. ग्राहकांनी वेळेत वीजबिले न भरल्यास वीज खरेदी मध्ये अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांना २४ X ७ वीजपुरवठा उपलब्ध करण्यासाठी वीजबिल इतर बिलाप्रमाणे म्हणजेच टीव्ही रिचार्ज, मोबाईल बिल सारखे प्राधान्याने भरावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले.

.............................

Web Title: Lockdown ended, recovery of overdue electricity bills ordered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.