मुंबई : लॉकडाऊनमध्ये तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत नसल्याने अनेकांची ही सवय सोडण्यात मदत मिळते आहे. मुळात, कोणतेही व्यसन सोडवताना शरीरात काही विशिष्ट बदल दिसून येतात. जसे, डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे, निद्रानाश, अंगात थंडी भरणे, क्रॅप येणे असे बदल शरीरात जाणवू लागतात. काही जणांना थकवा, चिडचिड, मन:स्थिती बिघडणे किंवा नैराश्य अशा समस्येला देखील तोंड द्यावे लागते. ही सर्व व्यसनापासून सुटल्याची लक्षणे आहेत. परंतु, लॉकडाऊननंतरही ही बदललेली सवय कायम ठेवण्यासाठी इच्छाशक्ती फार महत्त्वाची आहे. लोकांना कर्करोगापासून वाचायचे असल्यास तंबाखू व्यसन सोडणे गरजेचे आहे.‘जागतिक तंबाखूविरोधी दिना’च्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी तंबाखूच्या सेवानामुळे होत असलेल्या परिणामांचा परामर्श घेतला असून, व्यसनांपासून दूर राहावे, असे आवाहन केले आहे. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांमध्ये फुफ्फुसाचा कर्करोग होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मिशरीचा अतिरिक्त वापर हे यामागील मुख्य कारण आहे. ही मिशरी नाकातून किंवा रक्तावाटे फुफ्फुसात जात असल्याने कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो. अनेक महिला शौच साफ होईल म्हणून मिशरी लावतात. मात्र हा निव्वळ गैरसमज आहे, अशी माहिती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली....................................
तंबाखू सेवनामुळे फक्त कर्करोग होतो असे नाही तर हायपरटेन्शन, उच्च रक्तदाब, हृदयरोग व मेंदू विकार यांसारख्या गंभीर आजारही होऊ शकतात. भारतात सध्या तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. याचे प्रमुख कारण तंबाखूजन्य पदार्थांचे अतिरिक्त सेवन हेच आहे. दरवर्षी २ ते ३ लाख तोंडाच्या कर्करोगाच्या रूग्णांची नोंद होतेय. तोंडाच कर्करोग असलेल्या रूग्णांमध्ये ७०-८० टक्के रूग्णांना तंबाखूचे व्यसन असते. वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण कर्करोगातून बाहेर येऊ शकतो. मात्र अनेकदा रूग्ण शेवटच्या टप्प्यात डॉक्टरांकडे येतो. अशा स्थितीत रूग्णाला वाचवणे डॉक्टरांसाठी अशक्य होऊन जाते.- डॉ. मनोज लोखंडे
...................................
लॉकडाऊनचा कालावधी हा व्यसन सोडण्यासाठी अतिशय फायद्याच आहे. कारण सध्या लॉकडाऊनमुळे तंबाखूजन्य पदार्थ व मद्य लोकांना मिळत नाही. त्यामुळे हीच वेळ आहे तुम्ही व्यसनापासून स्वत:ला दूर ठेवू शकता. दारू किंवा सिगारेट सेवनाची इच्छा झाल्यास ती टाळण्यासाठी स्वत:चे मन विचलित करण्याचा प्रयत्न करा. स्वत:ला अन्य कुठल्या तरी कामात व्यस्त करून घ्या. घरात धुम्रपानरहित झोन तयार करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय जुनी गाणी ऐका, मित्रांशी सोशल मिडियावर संवाद साधा, चित्र काढा, पुस्तक वाचणे किंवा बागकाम करणे, अशा कामांमध्ये स्वत: रमवून घ्या. यामुळे तुमचे मन आनंदी व प्रसन्न राहिल.- प्रांजल डांगे, समुपदेशक
...................................
कर्करोगाची पूर्वलक्षणेतोंडातील पांढरा चट्टा, लाल चट्टा, लालसर पांढरा चट्टादोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ बरी न होणारी जखमतोंड पूर्णपणे न उघडणेतोंडात व मानेमध्ये आकाराने वाढत जाणारी गाठतोंडात सतत खराब, कुबट वास येणेआवाजात अचानक घोगरेपणा येणेमसालेदार पदार्थ खाताना तीव्र वेदना होणे...................................
- काय करता येईल
- तंबाखूचे व्यसन सोडायचे असल्यास शुगरलेस गम चावून खा.
- गाजरसारख्या कुरकुरीत गोष्टींची निवड करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो.
- गाजराचा रस नियमित प्यायल्यास दारूचे व्यसन सोडता येऊ शकते.
- धुम्रपान किंवा मद्यपान हे व्यसन सोडण्यासाठी योग्य ते व्यवस्थापन करा
...................................