Lockdown: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा लोकल प्रवास होणार सुरू; रेल्वे प्रशासनानचे मानले आभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 02:20 AM2020-07-03T02:20:55+5:302020-07-03T02:21:07+5:30
अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाºयांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू करण्यात आली आहे.
मुंबई : उपनगरीय लोकलमधून केंद्रीय कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास मान्यता मिळाली आहे. वेळेत आणि सुरक्षित प्रवास होत असल्याने कर्मचारी खूप खुश झाले आहेत. कर्मचाºयांनी रेल्वे प्रशासनाचे आभार मानले आहेत.
अत्यावश्यक सेवेतील निवडक कर्मचारी व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाºयांसाठी १५ जूनपासून मध्य व पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावर लोकल सुरू करण्यात आली आहे. केंद्रीय कर्मचाºयांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली नाही.
राज्य सरकारने १ जुलैपासून आयकर विभाग, राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी, न्यायालयातील कर्मचारी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट कर्मचारी, राजभवन, जीएसटी आणि कस्टम कर्मचारी, सुरक्षा विभाग या निवडक केंद्रीय कर्मचाºयांसाठी लोकल प्रवास करण्याची परवानगी दिली आहे.
लोकल सुरू झाल्या नव्हत्या, तेव्हा प्रवास करणे खूप अवघड होत होते. आता रेल्वेने राष्ट्रीयीकृत बँकिंग कर्मचाºयांनाही परवानगी दिली आहे. यासाठी रेल्वे व रेल्वेमंत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीयीकृत बँकेतील कर्मचारी हरिश्चंद्र मानवडे यांनी दिली.
रेल्वे प्रशासनाने लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी दिल्याने केंद्र सरकारचे कर्मचारी खूप आनंदित आहेत, अशी प्रतिक्रिया जीपीओतील कर्मचारी पद्मजा कामत यांनी दिली.
बसमधून कार्यालयात जाण्यासाठी खूप वेळ लागत असे. रेल्वेने केंद्र सरकारच्या कर्मचाºयांना परवानगी दिली आहे, हे एक चांगले पाऊल आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि भारतीय रेल्वे यांचे मनापासून आभार, अशी प्रतिक्रिया पोस्ट आॅफिसचे कर्मचारी शैलेश गुमरे यांनी दिली.