Join us

रुग्णसंख्या वाढल्यास मुंबईतही लॉकडाऊन; पालकमंत्री अस्लम शेख यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 6:49 AM

लोकांना आता स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यायला हवी. रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मुंबईतील कोरोनाची स्थिती अशीच कायम राहिली आणि लोक सूचनांचे पालन करत नसतील तर पुन्हा एकदा लाॅकडाऊन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा वस्त्रोद्योग आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिला.

लोकांना आता स्वतःची आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घ्यायला हवी. रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. लग्नासाठी ५० लोकांची परवानगी घेतात पण ३०० लोकांना बोलावतात. नाइट क्लबवर कारवाई सुरू केली आहे. जे हाॅटेल्स मानक प्रणालींचे पालन करत नाहीत, ५० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना बसवतात अशांचे परवाने रद्द करण्याची कारवाई सुरू केली आहे. जे पर्याय सरकारतर्फे राबवता येतील ते राबविले जात आहेत. पण, आता लाॅकडाऊन नको असेल तर लोकांनी नियमांचे पालन करायला हवे. स्वतःची, घरच्यांची, समाजाची काळजी घ्यायला हवी, असे शेख म्हणाले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामुंबई