Join us  

मुंबईसह राज्यात लॉकडाऊन गरजेचे - सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:07 AM

मुंबई : कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईसह राज्यात लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याची विनंती राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ...

मुंबई : कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईसह राज्यात लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याची विनंती राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

मुंबईमध्ये नागरिकांच्या बेपर्वाईला आळा घालण्यासाठी थोडी सक्ती करणे आवश्यक आहे. कारण वाढती रुग्णांची संख्या लक्षात घेता आयसीयू बेड, ऑक्सिजन बेड यांची जास्त गरज पडेल. पुढील पंधरवडा जास्त कसोटीचा आहे. रेमीडिसिव्हरचा वापर लवकर करणे गरजेचे आहे. तसेच एसओपी व प्रोटोकॉल तयार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने अंमलबजावणी करून कोरोनाला आळा घालणे गरजेचे आहे. तसेच टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट कडक केल्यास कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा बसेल असे डॉ. दीपक सावंत यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

हॉटेल कर्मचारी, दुकानदार, भाजीवाले, रस्त्यावर केश कर्तन करणारे यांची नियमित कोरोना चाचणी करून घेणे आवश्यक आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टसाठी नियमावली करणे, सलूनमध्ये संपर्क कमी करणे, रस्त्यावरचे सलून बंद करणे, सोसायटीमधील गेट टूगेदर बंद करणे यांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याची विनंती डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.