Lockdown News: दोन महिने दुकान बंद असूनही वीजबिलाचा आकडा मात्र तेवढाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 03:20 AM2020-05-03T03:20:42+5:302020-05-03T03:21:02+5:30

व्यापाऱ्यांमध्ये चिंंतेचे वातावरण । महामंडळ म्हणते नियमानुसारच बिल

Lockdown News: Even though the shop is closed for two months, the electricity bill is the same! | Lockdown News: दोन महिने दुकान बंद असूनही वीजबिलाचा आकडा मात्र तेवढाच!

Lockdown News: दोन महिने दुकान बंद असूनही वीजबिलाचा आकडा मात्र तेवढाच!

googlenewsNext

गौरी टेंबकर-कलगुटकर

मुंबई : लॉकडाउनमुळे दोन महिन्यांपासून दुकाने बंद आहेत, मात्र आम्हाला आकारण्यात येणाºया वीजबिलाची रक्कम मात्र तितकीच आहे. कामधंदा बसला असताना बिल भरायचे तरी कसे? अशी चिंंता आता व्यापारी वर्गाला लागली आहे. मात्र महाराष्ट्र वीज नियामक मंडळ (एमइआरसी)च्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच आम्ही बिल आकारत आहोत, असे उत्तर वीज कंपनीकडून देण्यात आले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य सर्वच दुकानांचे शटर डाउन आहे. मात्र असे असूनही अदानी वीज कंपनीकडून व्यापाऱ्यांना आकारल्या जाणाºया बिलाची रक्कम ही तितकीच आहे. जी दुकाने बंद आहेत, त्या आस्थापनांमध्ये विजेचा वापर होत नाहीये. मात्र तरीदेखील बिलाची रक्कम कमी न येता नेहमीप्रमाणेच येत असल्याचे अ‍ॅलर्ट ‘फोन पे’ तसेच अन्य आॅनलाइन पेमेंट अ‍ॅपमार्फत व्यापाºयांना मिळत असल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे.
कांदिवलीच्या महावीरनगर परिसरात केकच्या दुकान चालकाने दिलेल्या माहितीनुसार, त्याचे दुकान गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. मात्र तरीदेखील त्याला दुकान सुरू असताना जे बिल आकारले जायचे आसपास तीच रक्कम ‘फोन पे’ अ‍ॅलर्टवर दाखवत आहे. दुकान सुरू नसल्याने कमाई काहीच नाही, अशा परिस्थितीत ही रक्कम उभी कशी करायची, हा प्रश्न त्याला भेडसावत आहे. अशीच अवस्था सध्या अन्य व्यापारी वर्गाचीसुद्धा झाली आहे. त्यामुळे लॉकडाउन हटल्यानंतर बिल भरू शकलो नाही तर वीजपुरवठा खंडित होण्याची धास्तीदेखील त्यांना लागली आहे. त्यानुसार ‘लोकमत’ने याबाबत अदानी कंपनीच्या संबंधित अधिकाºयांना विचारले असता ‘आम्ही एमइआरसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच बिल आकारत आहोत. याबाबत वर्तमानपत्र तसेच वृत्तवाहिन्यांवरून माहिती देण्यात आली आहे.

सध्या कोरोनामुळे फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी रीडिंग कर्मचाºयांना आम्ही ग्राहकांच्या घरी पाठवणे बंद केले आहे. त्यानुसार आधीच्या बिलाच्या आधारे सरासरी रक्कम ग्राहकांना आकारण्यात येत आहे. मात्र परिस्थिती पूर्ववत झाल्यानंतर रीडिंग तपासून भरलेल्या बिलाची रक्कम कमी-अधिक करून ती ग्राहकांना दिली जाईल,’ असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच बिल भरण्यासाठी आम्ही कोणावरही जबरदस्ती केलेली नसल्याचेदेखील त्यांनी नमूद केले. मात्र याबाबत अधिकृत बोलण्यास कोणीही तयारी दाखवली नाही.

वारंवार येतोय अ‍ॅलर्ट
दुकान गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. मात्र तरीदेखील त्याला दुकान सुरू असताना जे बिल आकारले जायचे आसपास तीच रक्कम ‘फोन पे’ अ‍ॅलर्टवर दाखवत आहे. दुकान सुरू नसल्याने कमाई काहीच नाही, अशा परिस्थितीत ही रक्कम उभी कशी करायची, हा प्रश्न भेडसावत आहे.

Web Title: Lockdown News: Even though the shop is closed for two months, the electricity bill is the same!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.