मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ९ हजारांपर्यंत पोहचला आहे तर ३५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन केले आहे. या लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी पोलीस दिवसरात्र रस्त्यावर उभं राहून जनतेची सेवा बजावत आहेत. मात्र याच पोलिसांवर हल्ले झाल्याच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
याबाबत मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी लोक जर पोलिसांवर हल्ले करत असतील तर ही खूप गंभीर बाब आहे औरंगाबाद आणि पिंपरी येथील घटनांमुळे पोलिसांचं मनोधैर्य जर खचलं तर आजच्या कोरोनाच्या लॉकडाऊन काळात ते परवडणारं नाही. पोलिसांवर हात उगारणाऱ्या प्रत्येकाला, मग तो कोणत्याही धर्माचा-समाजाचा असेना, गृहमंत्र्यांनी असा धडा शिकवावा की, पुन्ही तशी चूक करण्याची हिंमत कुणीही करणार नाही असं शालिनी ठाकरे यांनी मागणी केली होती.
...तर पुन्हा ‘तशी’ चूक करण्याची हिंमत कोणीही करणार नाही; मनसेची सरकारकडे मागणी
यावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, पोलिसांवरचा हल्ला राज्य शासन सहन करणार नाही, ज्या ज्याठिकाणी पोलीस, डॉक्टर, आमच्या आरोग्य यंत्रणेवर हल्ला होईल तिथे कठोर शासन केले जाईल आतापर्यंत १५३ हल्ले पोलिसांवर झाले आहेत त्यामधील ५३५ आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पुढील काळात अशाप्रकारे हल्ला सहन करणार नाही. हल्लेखोरांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.
काही दिवसांपासून राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. पिंपरीमध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने जमावबंदी व संचारबंदी आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन करून आरोपी काळेवाडी येथे विनाकारण रस्त्यावर फिरत होते. त्यामुळे फिर्यादी यांनी त्यांना हटकले. या कारणावरून आरोपी यांनी त्यांच्याशी वाद घातला. आरोपी युनूस अत्तार याने व त्याच्या दोन्ही मुलांनी फिर्यादी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांच्या हातातील काठी हिसकावण्याचा प्रयत्न करून जिवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी करीत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला. वाकड पोलीस तपास करीत आहेत. पोलिसांना मारहाण केलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता तर औरंगाबाद येथील पोलिसांवर हल्ला केल्याची घटना समोर आली होती.
अन्य बातम्या
"डोनाल्ड ट्रम्प यांची गळाभेट करुनही पंतप्रधान नरेंद्र मोदींचं काम झालं नाही"
'ही' पक्षपाती आणि वादग्रस्त विधानं नवीन नाहीत; अमेरिकन सरकारी संस्थेचा रिपोर्ट भारताने फेटाळला
"बरं ते जॅकेट कायमचं उतरलंय की हा ‘Lockdown Look’ आहे?"
दिलासादायक! देशात 7027 तर जगात 9,35,115 जणांनी जिंकली कोरोनाविरुद्धची लढाई
बँकेतून पैसे काढायचेत? चिंता नको, 'हे' सरकार घरपोच आणून देतंय, यासाठी फक्त.