Join us

Coronavirus, Lockdown News: प्रतिबंधित क्षेत्रांमुळे धान्य वाटपात अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 1:49 AM

मुंबई : लॉकडाउनमुळे महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा शालेयपूर्व शिक्षण व पोषण आहार स्थगित करण्यात आला ...

मुंबई : लॉकडाउनमुळे महिला व बालकल्याण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये दिला जाणारा शालेयपूर्व शिक्षण व पोषण आहार स्थगित करण्यात आला आहे. असे असले तरी तीन ते सहा वर्षे वयोगटांतील बालकांना घरपोच शिधा देण्यात येणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले होते. मात्र शहर उपनगरातील प्रतिबंधित क्षेत्रांचे प्रमाण अधिक असल्याने त्या ठिकाणी धान्यवाटप करण्यात अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. शहर उपनगरात पाच हजार अंगणवाडी केंद्र आहेत.

याविषयी, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका-कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी सांगितले की, या अंगणवाडी सेविका झ्र मदतनीसांना अत्यावश्यक सेवेचे ओळखपत्र दिले नसल्याने त्यांना प्रवास करणे कठीण होते. याखेरीज, ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांना आरÞोग्य विमा जाहीर केला, मात्र शहरी विभागातील सेविका/ मदतीसांना असे लाभ दिले जात नाही, त्यामुळे नागरी भागातील अंगणवाडी कर्मचारी दुर्लक्षित आहेत.

अंगणवाड्यांमध्ये शालेयपूर्व शिक्षण व पोषण आहार हे उपक्रम सध्या बंद आहेत, त्यामुळे ३ ते ६ वर्षे वयोगटातील मात्र, बालकांच्या पोषण आहारात खंड पडू नये यासाठी त्यांना घरपोच शिधा देण्याचे आदेश यशोमती ठाकूर यांच्यातर्फे देण्यात आले आहेत. गरम ताज्या आहाराऐवजी बालकांना १५ मेपर्यंत घरपोच शिधा (टीएचआर) दिला जात आहे. महाराष्ट्र कन्झ्युमर्स फेडरेशन लिमिटेडतर्फे हा शिधा पोहोचवला जाईल. मुंबईत ३ ते ६ वयोगटातील दीड लाखांच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना घरपोच आहार मिळणार आहे़सोशल डिस्टन्सिंगचे पालनमुंबईत २५ टक्के पुरवठा झाला असून येत्या १५ दिवसांत राज्यभरात १०० टक्के शिधापुरवठा केला जाणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. शिधा घरपोच देताना सामाजिक अंतराचे काटेकोर पालन केले जात असून मास्क व हँडग्लोव्हजचा वापर केला जात आहे. महाराष्ट्र कंझ्युमर्स फेडरेशन लिमिटेडच्या साहाय्याने हे शिधावाटप सुरू आहे. अंगणवाडी सेविका लाभार्थी बालकाच्या पालकांना अंगणवाडीत बोलावून पॅकिंंग स्वरूपातील शिधा देत असल्याचे महिला व बालविकास सचिव आय. ए. कुंदन यांनी सांगितले.अनेक निर्णय संभ्रमातअंगणवाडी सेविकांना पुरविण्यात येणारे मास्क, संरक्षक साहित्यासाठी निधीची उपलब्धता, उन्हाळी सुट्ट्यांविषयी टांगती तलवार अशा अनेक निर्णयांबाबत संभ्रम आहे. यात वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून पारदर्शकता नसल्याने, मनुष्यबळाची कमतरता असल्याने निर्णय प्रलंबित आहे, वा निर्णय घेऊनही ते थेट सर्व अंगणवाडी कर्मचाºयांपर्यंत पोहोचत नाहीयत. त्यामुळे याचा विचार राज्य शासनाने करायला हवा. ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांप्रमाणे आम्हीही समर्पितपणे काम करत असतो, अशी व्यथा अंगणवाडी कर्मचारी आणि सेविकांनी मांडली.आमच्या आरोग्याचाही विचार व्हावाअंगणवाडीतील बालकांची काळजी राज्य शासन घेत आहेत. त्याचप्रमाणे, कर्मचारी व सेवक म्हणून आमचीही जबाबदारी शासनाने घ्यावी. कोरोनाच्या संकटात आम्हीही जीव धोक्यात घालून काम करत आहोत. त्यामुळे आमच्या आरÞोग्यचा विचार केला जावा याविषयी वरिष्ठांनीही पाठपुराव करावा अशी मागणी आहे. - आशा जाधव, अंगणवाडी सेविकाशिधा मिळण्यात खंडनियमितपणे शिधा मिळत नाहीय. याखेरीज, धान्याच्या वितरणावेळी अनेक समस्या उद्भवत आहेत, कारण प्रत्येक केंद्रावर मनुष्यबळाचा तुटवडा दिसून येत आहे. त्यामुळे या धान्य वितरणात खंड पडू नये आणि योग्य वितरण व्हावे यावर लवकर तोडगा काढण्यात यावा.- सुरेखा कांबळे,  पालक