Lockdown News: आता हेच ऐकायचं बाकी होतं; दारू हवी आहे, तर मग फॉर्म भरून द्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 03:48 AM2020-05-06T03:48:40+5:302020-05-06T07:12:33+5:30

‘उत्पादन शुल्क’ने काढला अजब फतवा

Lockdown News: That's all there was to hear; If you want alcohol, then fill out the form! | Lockdown News: आता हेच ऐकायचं बाकी होतं; दारू हवी आहे, तर मग फॉर्म भरून द्या!

Lockdown News: आता हेच ऐकायचं बाकी होतं; दारू हवी आहे, तर मग फॉर्म भरून द्या!

Next

मुंबई : दारूची दुकाने सुरू झाल्याने आनंदित झालेल्या मद्यप्रेमींना जरा अडचणीत टाकणारी बातमी आहे. तुम्हाला दारू हवी असेल, तर तुम्हाला आधी एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. त्यात तुमचा अनुक्रमांक, नाव, मोबाइल नंबर, कोणत्या ब्रँडची दारू तुम्हाला हवी आहे आणि किती हवी आहे, असा सगळा तपशील द्यावा लागेल.

उत्पादन शुल्क विभागाचे राज्य आयुक्त कांतीलाल उमाप यांनी यासंबंधीचा आदेश काढला आहे. या आदेशात दारू दुकानदारांसाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यानुसार ग्राहकांना उभे करण्यासाठी मार्किंग करावे लागेल व दोन मार्किंगमध्ये किमान सहा फुटांचे अंतर असेल.

दुकान सुरू करण्यापूर्वीच जे ग्राहक उभे असतील त्यांना त्या मार्किंगच्या ठिकाणी उभे करण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. ग्राहकांना त्यांची आॅर्डर देण्यासाठी एक मागणीपत्राचा नमुना देण्यात येईल. त्यात अनुक्रमांक, ग्राहकाचे नाव, मोबाइल नंबर आणि कुठल्या ब्रॅण्डची दारू हवी आहे व किती हवी आहे हे सगळे ग्राहकाला लिहून द्यावे लागेल. मागणीपत्र ग्राहकाकडून भरून घेतल्यानंतर त्याला टोकन क्रमांक देण्यात येईल. टोकन उपलब्ध नसतील तर कोऱ्या कागदावर दुकानदाराने स्वत:च्या दुकानाचा शिक्का व दूरध्वनी क्रमांक नमूद करून अनुक्रमांक द्यावा. तो अनुक्रमांक व ग्राहकांना दिलेल्या अनुक्रमांक हा सारखा असावा. थोडक्यात दुकानदाराने ग्राहकाला दिलेले ते टोकनच मानले जाईल.

दारू दुकानदाराने दर १५ मिनिटानंतर अथवा गरजेनुसार कोणत्या ग्राहकाच्या टोकन क्रमांकाची सर्व्हिस चालू आहे ते बोर्डवर नमूद करावे. ग्राहकांमध्ये सोशल डिस्टनसिंग राखण्यासाठी दुकानदाराने सुरक्षारक्षक नेमावा. उत्पादनशुल्क विभागाचे उपायुक्त, अधीक्षकांनी सातत्याने दारू दुकानांसमोरील गर्दी नियंत्रणाची व सोशल डिस्टन्सगची पाहणी करावी व आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.

सर्व खबरदारी घ्यावी
गरज भासल्यास पोलीस विभागाचे सहकार्य घ्यावे. ग्राहकांनी व दुकानदारांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच दुकानदाराने दुकानाच्या आवारात निर्जंतुकीकरण फवारणी वेळोवेळी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

४०० ग्राहकांना मिळणार दारू
दारूची दुकाने सकाळी १० ते ते सायंकाळी ६ पर्यंत सुरू राहणार आहेत. प्रत्येक ग्राहकामध्ये ६ फुटांचे सोशल डिस्टन्सिंग लक्षात घेता एका तासात पन्नास ग्राहकांना दारू मिळेल. म्हणजे आठ तासांत चारशे लोकांना एका दुकानातून दारू मिळू शकेल. चारशेच्या पुढील ग्राहकांना दुसऱ्या दिवशी सेवा देण्यात येईल.

 

Web Title: Lockdown News: That's all there was to hear; If you want alcohol, then fill out the form!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.