Join us

Lockdown News: समुपदेशनासाठी ‘ते’ रोज करतात चार किलोमीटर पायपीट; लॉकडाउनचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 1:32 AM

स्वमग्नता किंवा ऑटिझम ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. अशा मुलांच्या मनातील अनाकलनीय चिंता असते

सीमा महांगडे 

मुंबई : लॉकडाउनमुळे आपल्या सर्वांप्रमाणे स्वमग्न मुले आणि त्यांचे पालकही घरातच बंदिस्त झाले आहेत. सक्तीने घरात बसून स्वमग्न मुले तसेच त्यांच्या पालकांची चिडचिड होते किंवा इतरही एखाद्या कारणाने त्यांना नव्या मानसिक तणावांना-आव्हानांना सामोरे जावे लागते, अशा परिस्थितीत स्वत: एका अनोळखी ठिकाणी लॉकडाउन झालेले डॉ. सुमित शिंदे या पालकांच्या आॅनलाइन समुपदेशनसाठी आणि सेशन्ससाठी रोज तब्ब्ल चार किलोमीटरचा प्रवास करतात आणि लेक्चर्स घेतात.

स्वमग्नता किंवा ऑटिझम ही एक गुंतागुंतीची मानसिक स्थिती आहे. अशा मुलांच्या मनातील अनाकलनीय चिंता असते. नकारात्मक वर्तणूक, असंतुलित सामाजिक व्यवहार आणि संवाद साधता न येणे या समस्यांमुळे ते त्रासलेले असतात. त्यामुळेच अशा मुलांच्या पालकांना या लॉकडाउनच्या काळात अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांना अशा वेळी योग्य मार्गदर्शन व सल्ल्याची आवश्यकता असल्याने चाइल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर आणि चाइल्ड रिअ‍ॅक्ट फाउंडेशनचे डॉ. सुमित शिंदे स्वत: अलिबागमध्ये अडकलेले असताना रोज अलिबागच्या महाळुंगे गावाहून तब्ब्ल चार कि.मी. अंतरावर असलेल्या बोरली या गावात जिथे इंटरनेट सेवा आहे तिथे रोज येतात आणि समुपदेशनासाठी सेशन्स घेतात. तिथून ते स्काइपद्वारे मुलांना आणि पालकांना मार्गदर्शन करतात.

डॉ. शिंदे यांच्यासह त्यांच्या संस्थेचे आणखी १६ डॉक्टर, थेरपिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशक शहरातील विविध ठिकाणांहून स्वमग्न व लर्निंग डिसॅबिलिटी असणाऱ्या मुलांचे, पालकांचे आॅनलाइन सेशन्स घेत आहेत. विविध व्हिडीओद्वारे या काळात या मुलांना कोणत्या प्रकारे समजून घ्यावे, गुंतवून ठेवावे याचे प्रशिक्षण देत आहेत.उज्ज्वल भविष्यडॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनामुळे आमच्या बºयाचशा संकल्पना स्पष्ट झाल्या. मुलांमधील त्यांच्या खेळण्याच्या गरजा, भावनिक संकल्पना समजावून सांगण्यास मदत केली. आम्हाला असे मार्गदर्शन मिळाले आहे, ज्यामुळे मुलांना आम्ही तसे मार्गदर्शन केले तर त्यांचे भविष्य इतर सर्वसामान्य मुलांप्रमाणेच उज्ज्वल असेल, अशी आशा आहे. - अमेरिकेतील एका स्वमग्न मुलाचे वडील

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या