Lockdown News: वेसावकरांचा कोळीवाड्यात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 02:54 AM2020-05-04T02:54:27+5:302020-05-04T02:54:36+5:30

४ ते १० मे पूर्णत: बंद : रुग्णसंख्या रोखण्यासाठी निर्णय

Lockdown News: Vesavkar's one week public curfew in Koliwada | Lockdown News: वेसावकरांचा कोळीवाड्यात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू

Lockdown News: वेसावकरांचा कोळीवाड्यात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू

Next

मनोहर कुंभेजकर

मुंबई : एकीकडे पालिकेच्या के पश्चिम वॉर्डमध्ये कोरोनाने ५५०चा आकडा पार केला असताना, वेसावे कोळीवाड्यात कोरोनाचे ५५ रुग्ण झाले असून येथे कोरोनाची संख्या वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरातच थांबणे गरजेचे आहे. यासाठी उद्या ४ ते १० मेपर्यंत एक आठवड्याचा कडकडीत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय वेसावकरांनी घेतला आहे. यापूर्वी ११ ते १३ एप्रिल, २४ ते २६ मे असे तीन दिवसांचे दोन जनता कर्फ्यू वेसावकरांनी यशस्वी करून दाखवले होते.

वेसावा गावातील सर्व गावकऱ्यांनी जनता कर्फ्यूचे आयोजन केले असून ४ मे ते १० मेपर्यंत असा एक आठवडा कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. वेसावा गावातील निरनिराळ्या समाज संघटना एकत्र येऊन त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यारी रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर हायस्कूलच्या सभागृहात येथील प्राचार्य व समाजसेवक अजय कौल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे तसेच निरनिराळ्या संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते.

वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या पुढाकाराने जनता कर्फ्यूची दिलेली हाक लक्षात घेऊन वेसाव्यातील ईस्ट इंडियन ख्रिश्चन समाज, कोकणी सुन्नी जमात ट्रस्ट, यंग मुस्लीम कमिटी आणि इतर समाज संघटनांनी या जनता कर्फ्यूला जाहीर पाठिंंबा दिला आहे. मागे दोन वेळा तीन दिवस यशस्वी केलेला जनता कर्फ्यू आणि त्या वेळचा अनुभव लक्षात घेता कोरोना रुग्णांचे १०० टक्के उच्चाटन करावे यादृष्टीने एक आठवड्याचा जनता कर्फ्यू आयोजित केला आहे. या कालावधीत वेसावे गावातील प्रत्येक गल्ली विभागातील स्वयंसेवक यावेळी साहाय्य व नियंत्रण करणार असून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

मच्छीमार नेत्यांची हजेरी
या बैठकीला कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय, वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष महेंद्र लडगे, वेसावा मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नारायण कोळी उपस्थित होते.
 

Web Title: Lockdown News: Vesavkar's one week public curfew in Koliwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.