Join us

Lockdown News: ‘वेबिनार’ने वकिली क्षेत्रातही केला प्रवेश; कॉपोर्रेट संकल्पना स्वीकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2020 1:22 AM

सोशल मीडियाचा वापर; व्हिडीओ कॉन्फरन्सचा लाभ

मुंबई : दररोज हायकोर्टात न्यायाधीश, प्रतिवादीचे वकील यांच्या समोर उभे राहून युक्तिवाद करण्याची सवय असलेल्या वकिलांना या लॉकडाउनने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यास भाग पाडले. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आशिलाशी चर्चा करणे, न्यायालयात युक्तिवाद करणे, ई-फायलिंग या नव्या पद्धतींशी या लॉकडाउनने परिचय करून दिला. तसेच ज्ञानाचे आदान-प्रदान करण्यासाठी ‘वेबिनार’ ही कॉपोर्रेट क्षेत्रातली संकल्पना आता वकिलांतही रुजू लागली आहे.

सतत एका कोर्टरूममधून दुसऱ्या कोर्टरूममध्ये धावपळ करणे, केसेसमधून थोडी उसंत मिळाली तर आॅफिसमध्ये जाणे, त्यातच अशिलाशी भेटून केसबाबत चर्चा करणे, आदल्या दिवशी संध्याकाळी दुसºया दिवशीच्या केसेसचा अभ्यास करणे, असे व्यस्त वेळापत्रक असताना अचानक कोरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात येतो आणि सगळे वेळापत्रक ठप्प होते. सुरुवातीचे काही दिवस कुटुंबाला वेळ दिल्याबद्दल मनाला समाधान वाटते, मात्र काही दिवसांनी हेच मन वेळच वेळ मिळाल्याने अस्वस्थ होते. इतके स्वस्थ बसण्याची सवय नसल्याने बेचैनी वाढते. आता या वेळेचा सदुपयोग कसा करावा, याचा प्रश्न पडतो. मग यावर तोडगा म्हणून मी माझा वाचनाचा आणि चित्र काढण्याचा छंद पुन्हा जोपासायला सुरुवात केली, असे अ‍ॅड. नेहा भिडे यांनी सांगितले.

वाचनाबरोबरच आमच्या कायद्याच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आमच्यातील काही वकिलांनी वेबिनार सुरू केले. यामध्ये प्रसिद्ध आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे, श्रीहरी अणे यांना वक्ता म्हणून बोलावण्यात आले. त्यामुळे नवीन काहीतरी शिकायला मिळाले. खरे तर वेबिनार ही संकल्पना कार्पोरेट क्षेत्रातील, मात्र लॉकडाउनमुळे वकिलांनीही ही पद्धत स्वीकारली. त्याचबरोबर अशिलांबरोबर व्हिडीओ कॉन्फरन्स घेणे, ई-फायलिंग करणे, झूम अ‍ॅपद्वारे न्यायाधीशांसमोर युक्तिवाद करणे, या सर्व बाबी थोड्या जुन्या असल्या तरी आमच्यासाठी नव्या आहेत. त्यामुळे त्या अंगवळणी पडण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण भविष्यात याचा फायदा होईल, असे मत अ‍ॅड. सारंग आरध्ये यांनी व्यक्त केले.

आपल्याकडील केसेसचा अभ्यास करण्यासाठी तसेच प्रतिज्ञापत्र तयार ठेवण्यासाठी होत असल्याचे अ‍ॅड. प्रथमेश यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा अभ्यास करून स्वत:चे ज्ञान वाढवत असल्याचे त्यांनी सांगितले. एकंदरीत लॉकडाउनचा मोकळा वेळ हा ज्ञानवृद्धी करण्यासाठी व नव्या तंत्रज्ञानाशी मैत्री करण्यासाठी असल्याचे अनेक वकिलांचे मत आहे. यासाठी सोशल मीडियाचाही वापर केला जाताये़

टॅग्स :न्यायालयकोरोना वायरस बातम्यासोशल मीडिया