मुंबई : आधीच लठ्ठपणाने त्रस्त आणि त्यातच लॉकडाऊनमुळे घरी बसावे लागल्याने १८७ किलो वजन झालेल्या एका व्यक्तीने चक्क ३० किलो वजन कमी केले आहे. डॉ. अपर्णा गोविल-भास्कर यांच्याव्दारे या रूग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन महिन्यात या व्यक्तीचे वजन कमी झाले. यामुळे त्याचे वजन १८७ किलोहून १५७ किलोपर्यंत आले आहे. लॉकडाऊनच्या काळात वजन वाढल्याच्या तक्रारी घेऊन अनेक रूग्ण उपचारासाठी येत आहेत, अशी माहिती आरोग्य क्षेत्रातून देण्यात आली.
३६ वर्षीय अलोक शहा (नाव बदललेले) हे आयटी व्यावसायिक आहेत. लॉकडाऊनमध्ये त्यांच्या वजनात वाढ होऊन ते १८७ किलो झाले होते. अतिरिक्त वजनामुळे त्यांना चालता येत नव्हते. गुडघ्यामध्ये तीव्र वेदना जाणवत होती, श्वासही घेता येत नव्हता. अशास्थितीत डॉक्टरांनी वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेमुळे त्यांनी ३० किलो वजन कमी केले आहे. मुंबईतील एका रूग्णालयातील लेप्रोस्कोपिक ॲण्ड बॅरिअट्रिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल-भास्कर यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या काळात वजन वाढल्याच्या तक्रारी घेऊन अनेक रूग्ण उपचारासाठी येत आहेत.
अलोक यांच्या वजनातही अतिरिक्त वाढ झाली होती. त्यांचे वजन १८७ किलो इतके वाढले होते. हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी डिसेंबर २०२०मध्ये त्यांनी ऑनलाईन सल्ला मागितला होता. अशास्थितीत डिसेंबरमध्ये त्यांच्यावर लेप्रोस्कोपिक गॅस्टिक बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेनंतर अवघ्या तीन महिन्यात या रूग्णाने ३० किलो वजन कमी केले आहे. त्यामुळे आता त्याचे वजन १५७ किलो इतके झाले आहे. या शस्त्रक्रियेत स्टेपलचा वापर करून लहान थैलीच्या आकारात अन्ननलिकेशी संबंधित असलेला पोटाचा एक लहानसा भाग आतड्यांशी जोडला जातो. यामुळे रूग्णाला कमी भूक लागून वजन हळूहळू कमी होण्यास मदत मिळते.