मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबईत बुधवारी रात्रीपासूनच पुन्हा कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली असून तिचे उल्लंघन केल्यास अटक होऊ शकते. याचवेळी पनवेलमध्ये ३ ते १३ जुलै, नवी मुंबईत ४ ते १३ जुलै, ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ-बदलापुरमध्ये २ ते १२ जुलै; तर मीरा-भार्इंदरमध्ये बुधवारपासून कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.
मुंबईत १५ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता एक किंवा त्याहून अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरण्यावर बंदी आहे. मुंबई पोलिसांनी जमावबंदीसह संचारबंदी लागू केली आहे. सोबतच प्रवासी वाहतुकीवरही बंधने घातली आहेत. ती धुडकावणाऱ्यांसह आरोग्य विभागाने गृह किंवा संस्थात्मक अलगीकरणाबाबत दिलेल्या सूचना अमान्य करणारे, मास्कचा वापर न करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यास सुरूवात झाली आहे.एपीएमसी सुरू राहणारनवी मुंबईमध्ये ४ ते १३ जुलैदरम्यान संपूर्ण लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. मुंबईतील जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी एपीएमसी मार्केट सुरू ठेवले जाईल. ठाणे-बेलापूर पट्ट्यातील औद्योगिक वसाहतीही सुरू राहणार असल्याची माहिती नवी मुंबई पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.ठाणे ग्रामीणही लॉकडाऊनठाणे जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि ग्रामीण भागातही २ ते ११ जूलै दरम्यान ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आयुक्तालय क्षेत्रात ३१ जुलैपर्यंत मनाई आदेश लागू केला. त्याद्वारे सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन, खासगी-एसटीसह सार्वजनिक वाहतूक सेवा बंद राहतील. सायकलसह सर्वच वाहने तसेच प्रवासी वाहतुकीवर बंदी आहे.दोन किमीची मर्यादा कायममुंबईत पहाटे ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांना आणि शासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार कामासाठी बाहेर पडणाºयांनाच मुभा देण्यात आली आहे. सर्वसामान्य नागरिकांना मात्र आवश्यक कामांसाठी घराबाहेर फक्त दोन किमीपर्यंतच्या अंतरात तेही ठरलेल्या वेळेत प्रवास करता येईल. पोलीस उपायुक्त प्रणय अशोक यांनी याबाबतचे आदेश जारी केले.