मुंबई - राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारनं निर्बंध आणखी कडक केले आहेत. राज्यात लवकरच संपूर्ण लॉकडाऊन जाहीर होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. तसेच, मंत्री अस्लम शेख यांनीही संपूर्ण लॉकडाऊनचे संकेत दिले होते. त्यानुसार, बुधवारी मध्यरात्रीपासून राज्यातील सार्वजनिक प्रवास सेवेवर बंधने आली आहेत. त्यानुसार, सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करताना नियमावली जारी करण्यात आली आहे. तर, लोकल, मेट्रो आणि मोनोची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी सर्वच सदस्यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊनची महत्त्वाची मागणी केली. राज्यात कडक लॉकडाऊनची गरज या सर्वांकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, ट्रेन बस पूर्णपणे बंद केल्या तर अत्यावश्यक सेवांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, त्यावर काळजीपूर्वक अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं. विशेष म्हणजे, मुखमंत्री उद्धव ठाकरेंनी लॉकडाऊनबद्दल निर्णय घेतला आहे. पण, त्यासंदर्भातील घोषणा मुख्यमंत्री स्वत:च करतील, असेही टोपे म्हणाले होते. त्यानंतर, राज्यात बुधवारपासून सार्वजनिक वाहतूक सेवेसाठी नियमावली जारी करणयात आली आहे. त्यानुसार, लोकल, मोनो आणि मेट्रोमधून सर्वसामान्य नागरिकांना प्रवास बंदी घालण्यात आली आहे.
सरकारच्या नवीन निमयावलीनुसार 22 एप्रिल 2021 रात्री 8 वाजल्यापासून ते 1 मे सकाळी 7 वाजेपर्यंत ही नियमावली लागू असणार आहे.
सरकारी कार्यालयात केवळ 15 टक्के कर्मचाऱ्यांनी हजर रहावे, ज्यांना शक्य आहे त्यांनी वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडावा, असे सांगण्यात आलंय. विशेष म्हणजे, सार्वजनिक वाहतूकही सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली आहे. त्यानुसार, खासगी बस सेवांना केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच किंवा मेडिकल सुविधेसाठी वापरण्यात यावे, असे आदेशात म्हटले आहे.
आंतरजिल्हा वाहतुकीसाठीही नियमावली घालून देण्यात आली आहे. त्यानुसार, सरकारी वाहनांमधून प्रवास करणाऱ्याना ओळखपत्र पाहून पास जारी करण्यात यावा. तसेच, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनाही संबंधित खात्याकडून पास जारी करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली असून बसमध्येही 50 टक्क्यांपेक्षा जास्त प्रवासी नसावेत. दूरच्या प्रवासावरुन येणाऱ्या नागरिकांना 14 दिवसांचं होम क्वारंटाइन राहावं लागणार आहे.
लग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंडलग्नात फक्त 25 लोकांना परवानगी. एकाच हॅालमध्ये 2 तास कार्यक्रम आंतरजिल्हा प्रवास फक्त महत्त्वाच्या कारणांसाठी मुंबईत खासगी गाडीत प्रवास 50 टक्के क्षमतेनेसरकारी कार्यालय 15 टक्के क्षमतेनेखासगी बसेस 50 टक्के क्षमतेने.लग्न समारंभात नियंमांचं उल्लंघन केल्यास 50 हजार दंड. लोकल टेृनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांना प्रवेश. आयकार्ड तपासून तिकिट द्यावं.