लॉकडाऊनमध्ये दररोज विक्री होतोय २० हजार क्विंटल फळे, भाजीपाला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 01:31 AM2020-04-17T01:31:38+5:302020-04-17T01:31:46+5:30

शेतकऱ्यांना दिलासा; कृषी विभागाच्या प्रयत्नांना यश

Lockdown is selling 4,000 quintals of fruits, vegetables daily | लॉकडाऊनमध्ये दररोज विक्री होतोय २० हजार क्विंटल फळे, भाजीपाला

लॉकडाऊनमध्ये दररोज विक्री होतोय २० हजार क्विंटल फळे, भाजीपाला

Next

मुंबई : शेतमालाला बाजारपेठ देतानाच नागरिकांनाही भाजीपाला, धान्य, फळे मिळावी यासाठी कृषि विभागाने समग्र नियोजन करून मोठ्या शहरांमधील सोसायट्यांमध्ये थेट शेतमाल विक्रीची आणि आॅनलाईन विक्रीची व्यवस्था निर्माण केल्याने राज्यात २८ मार्चपासून २, ९८६ शेतकरी उत्पादक गट, आत्मा गट यांच्या माध्यमातून शेतमालाची दररोज सुमारे २० हजार क्विंटल आॅनलाईन आणि थेट विक्री होत आहे.

कृषी विभागामार्फत स्थापन केलेले शेतकरी गट, उत्पादक कंपन्या, संस्था, आत्मा गट, स्वयंसहाय्यता गट, व्यक्तीगट उत्पादक यांच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत स्थानिक प्रशासनाच्या मदतीने निश्चित केलेल्या ठिकाणी शेतमालाची विक्री तसेच आॅनलाईन पद्धतीने नोंदणी करून विक्रीसाठी कृषी विभागाने तयारी केली. विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि आयुक्त सुहास दिवसे यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, तहसीलदार यांच्या समन्वयातून थेट विक्रीसाठी स्थळ निश्चिती केली. शेतमालाची पिशवी तयार करून त्याची विक्री करण्यात येत आहे.

कोरोनाच्या या संकट काळात शेतकरी हित समोर ठेवून शहरी भागातील नागरिकांना वेळेवर भजीपाला, फळे उपलब्ध व्हावीत आणि नाशवंत शेतमालाला बाजारपेठ मिळावी यासाठी कृषि विभागाने केलेल्या नियोजनामुळे दैनंदिन सुमारे २० हजार क्विंटल शेतमालाची विक्री होत आहे.
- दादा भुसे, कृषी मंत्री

या सर्व व्यवस्थेच्या संनियंत्रणासाठी तालुका, जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी याच्या कार्यालयांमध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले.
- एकनाथ डवले, सचिव, कृषी विभाग

Web Title: Lockdown is selling 4,000 quintals of fruits, vegetables daily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.