राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढला, ठाकरे सरकारचा आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 03:47 PM2020-06-29T15:47:25+5:302020-06-29T16:26:28+5:30

राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले आहेत.

Lockdown in state extended till July 31, Thackeray government orders issued | राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढला, ठाकरे सरकारचा आदेश जारी

राज्यात 31 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढला, ठाकरे सरकारचा आदेश जारी

Next

मुंबई - राज्यातील लॉकडाऊन 30 जुनपर्यंत असून पुढे काय, असा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला होता. राज्यात टप्प्या-टप्प्याने अनलॉक होत आहे, मात्र अद्यापही जिल्हाबंदी कायम आहे. त्यातच, एसटी महामंडळाकडून बससेवा सुरु करण्यात आली नाही. त्यामुळे, जुलै महिन्यातील अनलॉकमध्ये आणखी काय शिथिलता मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनेतशी संवाद साधत कोरोनाविरुद्धची पुढील रणनिती सांगितली. 30 जूननंतर लॉकडाउन उठणार नाही, असे स्पष्ट शब्दात उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्यानंतर, राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. 'मिशन बिगीन अगेन' अंतर्गत देण्यात आलेल्या सवलती, नियमांमधील शिथीलता कायम राहील, असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्य सरकारने मिशन बिगेन अगेन सुरु झाले असले तरी कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात शनिवारी ५ हजार ३१८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून १६७ मृत्यू झाले आहेत. त्यामुळे राज्याची रुग्णसंख्या १ लाख ५९ हजार १३३ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार २७२ झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनेतला आवाहन केलंय की, अद्याप काळजी घेणे गरजेचं आहे. कोरोनाचं संकट अद्यापही टळलेलं नाही. सध्या आपण कात्रीत सापडलो असून अर्थचक्राला गती देण्यासाठी आपण मिशन बिगेन अगेन सुरु करतोय. मात्र, लॉकडाउन सुरुच राहणार आहे. त्यानंतर, सरकारने 31 जुलैपर्यंत राज्यातील लॉकडाऊन वाढवला आहे. 

राज्यातील कंटोनमेंट झोन क्षेत्रात लॉकडाउनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार, 31 जुलैपर्यंत हा लॉकडाउन वाढविण्यात आला आहे. मात्र, मिशन बिगेन अगेन १ मध्ये नागरिकांना जी सवलत देण्यात आली होती, ती या लॉकडाऊनमध्येही कायम असणार आहे. तर, मिशन बिगेन अगेन २ मध्ये हळू हळू इतरही सेवा सुरळीत करण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. मात्र, शासनाचा आदेश येईपर्यंत हा लॉकडाऊन आणि शिथिलता देण्यात आलेल्या आस्थपनाच सुरु राहणार आहेत. नवीन सवलतींबाबत शासनाकडून वेळोवेळी माहिती देण्यात येईल.   

अन्य महत्वाच्या बातम्या...

राज ठाकरेंच्या गाडीचा आणखी एक ड्रायव्हर 'कोरोना पॉझिटीव्ह'

'सलमान खानकडून सुशांतला देण्यात येत होत्या धमक्या' 

तेलंगणाच्या गृहमंत्र्यांना कोरोना, सार्वजनिक कार्यक्रमातील उपस्थितीमुळे खळबळ 

इंधन दरवाढ मागे घ्या, पेट्रोल दरावाढीविरोधात काँग्रेस आक्रमक
 

Read in English

Web Title: Lockdown in state extended till July 31, Thackeray government orders issued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.