Mumbai CST Bridge Collapse : अधिकारी आणि ऑडिटरवर खुनाचा गुन्हा दाखल करा - मिलिंद देवरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 11:02 PM2019-03-14T23:02:04+5:302019-03-14T23:02:27+5:30

या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम 302 अन्वये गुन्हे दाखल करायला पाहिजे, अशी मागणी मिलिंद देवरा यांनी केली आहे. 

lodge an FIR under IPC Section 302 which amounts to murder, against the concerned officers & auditors - Milind Deora | Mumbai CST Bridge Collapse : अधिकारी आणि ऑडिटरवर खुनाचा गुन्हा दाखल करा - मिलिंद देवरा

Mumbai CST Bridge Collapse : अधिकारी आणि ऑडिटरवर खुनाचा गुन्हा दाखल करा - मिलिंद देवरा

googlenewsNext

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पूल कोसळल्याची दुर्घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 36 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेवरून काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी मुंबई पालिका प्रशासन आणि सरकारवर टीका केली आहे. तसेच, या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम 302 अन्वये गुन्हे दाखल करायला पाहिजे, अशी मागणी मिलिंद देवरा यांनी केली आहे. 

याचबरोबर, हा पूल मुंबई पालिकेच्या अखत्यारितील असून सहा महिन्यांपूर्वीच या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले होते. मात्र, संबंधित ऑडिटरने हे पूल धोकादायक नसल्याचा अहवाल दिला होता. तसेच, पुलाची किरकोळ दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याचेही म्हटले होते. असे असतानाही जर पूल कोसळत असेल तर ही गंभीर घटना आहे. त्यामुळे पुलाचे ऑडिट करणाऱ्या संबंधित ऑडिटर आणि या ऑडिटरची नियुक्ती करणाऱ्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवरही कलम 302 अन्वये (खुनाचा गुन्हा) कारवाई करायला पाहिजे, असे मिलिंद देवरा यांनी सांगितले. 




दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला, तर 36 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

या घटनेतील मृतांची नावे - 
1. अपुर्वा प्रभू (35 वर्ष) 2. रंजना तांबे (40 वर्ष) 3. जाहीद सिराज खान (32 वर्ष) 4. भक्ती शिंदे (40 वर्ष) 5. तपेंद्र सिंह (35 वर्ष) 

या घटनेतील जखमींची नावे -
1. सोनाली नवले (30 वर्ष) 2. अध्वित नवले 3. राजेंद्र नवले (33 वर्ष) 4. राजेश लोखंडे (39 वर्ष) 5. तुकाराम येडगे (39 वर्ष) 6. जयेश अवलानी (46 वर्ष) 7. मोहन कायगडे (40 वर्ष) 8. महेश शेरे 9. अजय पंडित (31 वर्ष) 10. हर्षदा वाघळे (35 वर्ष) 11. विजय भागवत (42 वर्ष) 12. निलेश पाटावकर 13. परशुराम पवार 14. मुंबलिक जैसवाल 15. मोहन मोझाडा (43 वर्ष) 16. आयुषी रांका (30 वर्ष) 17. सिराज खान 18. राम कुपरेजा (59 वर्ष) 19. राजेदास दास (23 वर्ष) 20. सुनील गिर्लोटकर (39 वर्ष) 21. अनिकेत अनिल जाधव (19 वर्ष) 22. अभिजीत माना (31 वर्ष) 23. राजकुमार चावला (49 वर्ष) 24. सुभाष बॅनर्जी (37 वर्ष) 25. रवी लगेशेट्टी (40 वर्ष) 26. नंदा विठ्ठल कदम (56 वर्ष) 27. राकेश मिश्रा (40 वर्ष) 28. अत्तार खान (45 वर्ष) 29. सुजय माझी (28 वर्ष) 30. कानुभाई सोलंखी (47 वर्ष) 31. दीपक पारेख .
 

Web Title: lodge an FIR under IPC Section 302 which amounts to murder, against the concerned officers & auditors - Milind Deora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.