याद्यांच्या घोळात अडकली कर्जमाफी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 05:39 AM2017-11-20T05:39:43+5:302017-11-20T05:40:45+5:30

राज्य सरकारने १० जुलै रोजी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा सरकारी घोळ अजून संपला नसल्यामुळे ही योजना रेंगाळली आहे.

Lodged in debt! | याद्यांच्या घोळात अडकली कर्जमाफी!

याद्यांच्या घोळात अडकली कर्जमाफी!

Next


मुंबई- राज्य सरकारने १० जुलै रोजी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा सरकारी घोळ अजून संपला नसल्यामुळे ही योजना रेंगाळली आहे. कर्जमाफीसाठी २२ सप्टेंबरपर्यंत ५६ लाख ५९ हजार १७८ शेतकºयांनी संपूर्ण माहितीसह आॅनलाइन अर्ज शासनाकडे सादर केले. त्यानंतर, लेखापरीक्षकांनी बँकांमध्ये जाऊन या अर्जांची पडताळणी केली. लेखापरीक्षकांनी काढलेल्या त्रुटी दूर करून, अद्ययावत याद्या अपलोड करण्यात आल्या, पण त्यानंतर रोज सॉफ्टवेअरमध्ये बदल आणि नवीन माहितीमुळे याद्या अपलोडच्या कामास विलंब लागत असून, आजही हे काम पूर्ण झालेले नाही. कर्जमाफीची योजना जाहीर होऊन चार महिने झाले, तरी अद्याप याद्यांचा घोळ संपलेला नाही.
कर्जमाफीच्या अटी आणि चाळणींची प्रक्रिया पाहता, फारच थोड्या शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळेल. ऊस आणि द्राक्षबागांचे प्रमाण जिल्ह्यात मोठे असूनही त्यांना योजनेचा लाभ मिळू शकत नाही.
- दिलीपतात्या पाटील,
अध्यक्ष, सांगली जिल्हा बँक
पुणे जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २६ लोकांना साडेअठरा लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. दुसरी १३२ शेतकºयांची यादी मिळाली असून, त्यांना ७० लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे, परंतु ही रक्कम जमा करण्याचे आदेश अद्याप शासनाने जिल्हा बँकेला दिलेले नाहीत. त्यामुळे शासनस्तरावर गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- रमेश थोरात, अध्यक्ष,
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
याद्यांच्या घोळामुळे कर्जमाफीला उशीर होत आहे. जिल्हा बँकेकडे २,०५,२७० सभासदांच्या फाइल अपलोड केल्या. फक्त २२९ सभासदांच्या खात्यातच रक्कम जमा झाली आहे. यावरून कर्जमाफीची स्थिती लक्षात येऊ शकते. सरकारने गती वाढवून लवकरात लवकर शेतकºयांना कर्जमाफी मिळवून
द्यावी.
- सुरेश पाटील, अध्यक्ष,
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
यापूर्वी संपूर्ण माहिती पाठविली असतानाही पुन्हा नव्याने माहिती मागविण्यात आली आहे़ त्यामुळे सहजरीत्या कर्जदार शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू न देण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे नवनवीन नियमांवरून दिसून येत आहे.
- अ‍ॅड़ श्रीपतराव काकडे, अध्यक्ष, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
कर्जमाफीसाठी जिल्हा बँकेतून ८६ हजार अर्ज भरण्यात आले. पैकी कर्जमाफीस पात्र ठरलेल्या २६८ शेतकºयांसाठी ५८ लाखांचा निधी मिळाला आहे.
- मनोज मरकड, अध्यक्ष,
जिल्हा मध्यवर्ती बँक, जालना.
कर्जमाफीचे जवळपास ६० हजार लाभार्थी आहेत, परंतु अद्याप यादी अप्राप्त आहे. ३२ शेतकºयांना जेमतेम सर्टिफिकेट दिले आहे, परंतु त्यांच्या कर्जखात्यात रुपयाही जमा झालेला नाही. ही कसली कर्जमाफी?
- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा मध्यवती सहकारी बँक, अमरावती
दोन दिवसांपूर्वी कर्जमाफीसाठी पैसे बँकेकडे आले आहे, परंतु सहकार विभागाची यादी आल्यानंतरच शेतकºयांच्या खात्यात पैसे टाकले जातील.
- अरविंद देशपांडे,
प्रभारी व्यवस्थापक,
जिल्हा मध्यवर्ती बँक, यवतमाळ.
यादीच स्पष्ट नसल्याने शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा करता येत नाहीत. याबाबत अधिक माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून मिळू शकेल.
- जितेंद्र देशमुख, व्यवस्थापकीय संचालक, जळगाव जिल्हा बँक.
आकडेवारी सध्याच सांगणे कठीण कर्जमाफीचा पैसा हा लाभार्थी शेतकºयांच्या नावाने आला आहे. पहिल्या यादीमध्ये २,४९९ लाभार्थी शेतकºयांचा समावेश आहे. आठवड्याच्या शेवटपर्यंत उर्वरित लाभार्थ्यांच्याही खात्यात पैसा जमा होईल, परंतु हे लाभार्थी वेगवेगळ्या बँकेचे आहेत. यातही राष्ट्रीयीकृत बँकेचे अधिक आहेत. प्रत्येक बँकेतील लाभार्थ्यांची यादी व एकूणच रक्कम वेगवेगळी असून, ती परस्पर त्या-त्या बँकेकडे सादर करण्यात आली आहे. त्यामुळे ती एकत्रित किती, हे आताच सांगता येणार नाही.
- सतीश भोसले, जिल्हा
उपनिबंधक अधिकारी, नागपूर
शेतीसाठी कर्ज घेतले होते. पावसाने दडी मारल्याने पीक चांगले आले नाही. त्यामुळे कर्ज परत करणे जमले नाही. शासनाने कर्जमाफीची घोषणा केल्याने समाधान वाटले. यासाठी आॅनलाइन अर्ज भरला. चार वेळा केंद्रावर हेलपाटे मारले. रांगेत उभे राहून अर्ज भरला. आता दोन महिने झाले, तरी दमडीदेखील बँक खात्यात जमा झालेली नाही.
- रामचंद्र दगडू शिंदे,
शेतकरी, खेड
निकष शेतकºयांसाठीच का?
शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळायला हवी होती. कुठल्याही निकषांची गरज काय? विजय मल्ल्याला कर्जमाफी दिली, तेव्हा त्याच्यासाठी कोणते निकष लावण्यात आले होते? कर्जबाजारी होण्यास शासनच जबाबदार आहे. कर्जमाफीची घोषणा केवळ प्रसिद्धीसाठी आहे.
- अमिताभ पावडे, कृषितज्ज्ञ

Web Title: Lodged in debt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.