संपुर्ण लसीकरण झालेल्या सोसायटी, कार्यालयांवर लागणार लोगो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:07 AM2021-09-21T04:07:50+5:302021-09-21T04:07:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेल्या गृहनिर्माण संस्था, इमारती आणि कार्यालयांवर नवे लोगो लागणार आहेत. ...

Logos will be affixed on all vaccinated societies and offices | संपुर्ण लसीकरण झालेल्या सोसायटी, कार्यालयांवर लागणार लोगो

संपुर्ण लसीकरण झालेल्या सोसायटी, कार्यालयांवर लागणार लोगो

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोविड प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेल्या गृहनिर्माण संस्था, इमारती आणि कार्यालयांवर नवे लोगो लागणार आहेत. पालिकेने अशा आस्थापनांची ओळख पटविण्यासाठी संपूर्ण माहिती असलेले क्यूआर कोडचे लोगो तयार करावेत, अशी सूचना राज्याचे पर्यटन मंत्री आणि उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुंबईतील सर्व नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करणे तसेच तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी आवश्यक सुविधांचा आज पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संबंधित उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ठाकरे यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तर त्याविरुद्ध लढण्यासाठी उपलब्ध असणारे बेड्स, ऑक्सिजनसह इतर सुविधा यासंबंधी मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजनेचा आढावा घेतला. सर्व नागरिकांचे लसीकरण करणे हे शासनाचे लक्ष्य आहे. त्यात महिलांच्या लसीकरणावर विशेष भर देण्यात येणार आहे. याबाबतही त्यांनी माहिती घेतली. त्याचबरोबर व्हेक्टर बॉर्न डिसीजवर नियंत्रण मिळविण्याबाबत स्थानिक प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

मागील आठवड्यात फक्त महिलांसाठी लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून एका दिवसात मुंबईत १.२७ लाख महिलांचे लसीकरण करण्यात यश आले. याबद्दल संबंधित यंत्रणांचे अभिनंदन करून ठाकरे म्हणाले की, यापुढे लसीकरणाचा दुसरा डोस देण्याबाबतही योग्य नियोजन करावे. यामध्ये महिलांबरोबरच विद्यापीठांचे विद्यार्थी, कामावर जाणाऱ्या नागरिकांचा प्राधान्याने समावेश करण्यात यावा. दुसरा डोस झाल्यानंतर ज्या इमारती, कार्यालये, गृहनिर्माण सोसायट्यांमधील नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असेल, त्या इमारतींच्या प्रवेशद्वाराजवळ क्यूआर कोडसह विशेष लोगो लावण्यात यावा, अशी सूचनाही त्यांनी मुंबई महानगरपालिकेला केली.

Web Title: Logos will be affixed on all vaccinated societies and offices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.