मुंबई : राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगात १ ऑगस्ट रोजी लोकअदालतचे आयोजन करण्यात आले आहे. लोकअदालतीमध्ये दोन्ही पक्षांच्या संमतीनेच निर्णय घेण्यात येतो. त्यामुळे पक्षकारांमधील विवाद लवकर संपुष्टात येण्यास मदत होते. जे पक्षकार लोकअदालतीद्वारे वाद सोडविण्यास इच्छुक आहेत, त्यांनी राज्य लोक आयोगाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य आयोगातर्फे करण्यात आले आहे.
--------------------------
कोरेगाव-भीमा आयोगाचे कामकाज २ ऑगस्टपासून सुरू
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव-भीमा चौकशी आयोगाने दि. २ ऑगस्ट ते ६ ऑगस्ट या कालावधीत त्यांच्या कार्यालयात अर्ध-आभासी सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या सुनावणीसाठी केवळ वकील आणि साक्षीदार यांनाच आयोगाच्या कार्यालयात प्रवेश दिला जाईल. कार्यालयात भेट देणाऱ्या व्यक्तींना कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.